‘…तर कानाखाली आवाज काढेन’, अजित पवार कार्यकर्त्यांवर प्रचंड संतापले

अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर आज प्रचंड संतापले. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना नीट वागण्याचा आणि काम करण्याचा सल्ला दिला. तसेच पक्षाची बदनामी होईल असं कृत्य केल्यास टोकाचे निर्णय घेतले जातील, असा इशारा देखील अजित पवारांनी यावेळी दिला.

'...तर कानाखाली आवाज काढेन', अजित पवार कार्यकर्त्यांवर प्रचंड संतापले
Follow us
| Updated on: Jun 05, 2023 | 5:28 PM

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज आपल्या कार्यकर्त्यांना अतिशय कठोर शब्दांमध्ये दम दिलाय. कामं केली नाहीत तर कानाखाली देईन. तुमचं पद काढून घेईन, अशा शब्दांत अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना सुनावलं आहे. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक पार पडली. ही बैठक राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांसाठी होती. या बैठकीत अजित पवार संतापले. या बैठकीत अजित पवारांनी मुळशी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना खडेबोल सुनावलं.

“तुम्ही देखील कामं करायची आहे. मुळशीच्या लोकांना पदं दिली आहेत. भांडायचं नाही. नाहीतर एकेकाच्या कानाखालीच आवाज काढेन. यातून तुमची बदनामी होत नाही तर आमची बदनामी होते. शरद पवारांची बदनामी होते. हा कुठला फाजीलपणा चाललाय? मी पदाचा राजीनामा घेईन हा? मी फार टोकाचं वागेन मग, अजिबात ऐकून घेणार नाही”, अशा शब्दांत अजित पवार यांनी सुनावलं.

“एकदा तुम्ही पदाधिकारी झाल्यानंतर तुमच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन तसा असतो. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोकप्रतिनिधी म्हणून तिथे बसतात. तुम्ही राष्ट्रवादीचे पदाधिकारी सदस्य म्हणून तिथे बसतात. ही कुठली पद्धत आहे. मी हे तर नवीनच बघायला लागलेलो आहे”, असं अजित पवार कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले.

हे सुद्धा वाचा

अजित पवार संतापण्यामागील नेमकं कारण काय?

अजित पवार यांनी एवढं संतापन्यामागील कारण आता समोर आलं आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी नेमकं काय घडलं होतं, या विषयी सविस्तर माहिती दिली. मुळशी तालुक्यातील दोन पदाधिकाऱ्यांमध्ये वाद उफाळल्याने अजित पवार संतापल्याची माहिती समोर आली आहे.

“हा वाद पक्षाचा नाही. दोन्ही कार्यकर्ते हे राष्ट्रवादी पक्षाचेल कार्यकर्ते आहेत. हे दोघं कार्यकर्ते माजी सभापती आहेत. तसेच त्यापैकी एक कार्यकर्ता एका बँकेचा उपसभापती आहे. आमच्या पक्षात कोणतेही वाद नाहीत. पण त्यांच्यात वैयक्तिक हवेदावे झाले असतील. त्यातून त्यांच्यातील वाद उफाळून आला. तो वाद आम्ही तेव्हाच मिटवला होता”, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिली.

अजित पवार त्यांच्या रोखठोक स्वभावासाठी ओळखले जातात. अजित पवार नेहमी रोखठोकपणे आपली भूमिका मांडत असतात. त्यांना कामात दिरंगाई चालत नाही. तसेच त्यांना कामात नीटनेटकेपणा आणि चांगलं काम लागतं. या कारणासाठी त्यांनी अनेकदा अधिकाऱ्यांना देखील धारेवर धरल्याचं बघायला मिळालं आहे. यावेळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना धारेवर धरलंय. कार्यकर्त्यांनी पुन्हा तशा चुका करु नये हा त्यामागील उद्देश होता, अशी चर्चा राष्ट्रवादीच्या गोटात आहे.

Non Stop LIVE Update
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?.
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा.
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद.
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?.
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.