Ajit Pawar : सर्व बसेस इलेक्ट्रिक अन् चकाचक करणार; एसटी महामंडळ वर्धापन दिनाच्या पुण्यातल्या कार्यक्रमात अजित पवारांची ग्वाही

| Updated on: Jun 01, 2022 | 11:49 AM

महाराष्ट्रात टप्प्याटप्प्याने ई-बस सुरू करण्याचे नियोजन आहे. इथून पुढे मनामध्ये कोणताही किंतू-परंतू आणू नका. वर्धापन दिनाच्या निमित्ताने पुणे-अहमदनगर शिवाई ई-बस सुरू होणार आहे. तसेच त्याच्या चार्जिंग स्टेशनचीही व्यवस्था केली जाणार आहे, असे अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar : सर्व बसेस इलेक्ट्रिक अन् चकाचक करणार; एसटी महामंडळ वर्धापन दिनाच्या पुण्यातल्या कार्यक्रमात अजित पवारांची ग्वाही
एसटीच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात बोलताना अजित पवार
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे : जे एसटी कर्मचारी, प्रवासी यांच्या फायद्याचे आहे ते ते सर्व महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) करेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. ते पुण्यात बोलत होते. सर्व बसेस इलेक्टिक अन् चकाचक करणार, असे ते यावेळी म्हणाले. एसटी महामंडळ वर्धापन दिन सोहळा आज साजरा होत आहे. यावेळी अजित पवारांच्या (Ajit Pawar) हस्ते शिवाई या ई-बसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला, त्या कार्यक्रमप्रसंगी त्यांनी सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या सोबत असल्याचे सांगितले. यावेळी अजित पवार यांच्यासोबत परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) आणि इतर नेतेही उपस्थित होते. 1 जून 1948 या दिवशी पहिली एसटी बस पुणे-अहमदनगर या मार्गावर धावली. आज याच दिवशी आपण या मार्गावर ई-बस सुरू करत आहोत. सर्वांनी या कार्याला सहकार्य करावे, किंतू-परंतू मध्ये आणू नये, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

‘बसेस इलेक्ट्रिक आणि चकाचक करू’

महाराष्ट्रात टप्प्याटप्प्याने ई-बस सुरू करण्याचे नियोजन आहे. इथून पुढे मनामध्ये कोणताही किंतू-परंतू आणू नका. वर्धापन दिनाच्या निमित्ताने पुणे-अहमदनगर शिवाई ई-बस सुरू होणार आहे. तसेच त्याच्या चार्जिंग स्टेशनचीही व्यवस्था केली जाणार आहे. मेट्रोवर लाखो रुपये आपण खर्च करतो, तो केलाही पाहिजे. मात्र आता इलेक्ट्रिक बसवर खर्च करण्याची वेळ आली आहे. सर्व बसेस इलेक्ट्रिक आणि चकाचक करायला हव्यात. त्याला काय लागतील ते पैसे आपण उभे करू. कारण तीन हजार बसेसचे टार्गेट आपण केले होते. आता यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची, कॅबिनेटची परवानगी घेऊन याबाबतचा निर्णय घ्यावा लागेल, असे ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

काय म्हणाले अजित पवार?

‘आता याला दृष्ट लावू देऊ नका’

पुढे ते म्हणाले, की गेली दोन वर्ष आपण कोरोनाच्या संकटात होतो. लॉकडाऊनमध्ये मोठी किंमत एसटीला मोजावी लागली. मध्ये काही अडचणी आल्या, संप झाला. आम्ही समजावून सांगत होतो, आपण एका परिवारातले आहोत. सुदैवाने पुढे मार्ग निघाला. आता याला दृष्ट लावू देऊ नका. कोणी काही वेडेवाकडे सांगितले तर त्याला महत्त्व देऊ नका, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी रिक्षा परमीट, पुण्यातले फुलेनगरचे आरटीओ, महामंडळांना मदत अशा विविध विषयांवर मत व्यक्त केले.