AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘जितेंद्र आव्हाड यांच्यावर 354 गुन्हा दाखल झाला तेव्हा अजित पवारांनी पोलिसांना फोन केलेला’, राष्ट्रवादीच्या नेत्याचा गौप्यस्फोट

"जितेंद्र आव्हाड यांच्यावर 354 गुन्हा दाखल झाला तेव्हा देखील अजित पवारांनी पोलिसांना फोन लावून चौकशी नीट करा. ते न करता कसा काय गुन्हा लावता? असे विचारले होते. हे आपण विसरलात का?", असा प्रश्न आनंद परांजपे यांनी जितेंद्र आव्हाड यांना विचारला आहे.

'जितेंद्र आव्हाड यांच्यावर 354 गुन्हा दाखल झाला तेव्हा अजित पवारांनी पोलिसांना फोन केलेला', राष्ट्रवादीच्या नेत्याचा गौप्यस्फोट
राष्ट्रवादीच्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: May 28, 2024 | 6:07 PM
Share

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाचे नेते आनंद परांजपे यांनी प्रत्युत्तर दिले आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी पुणे हिट अँड रन प्रकरणावरुन अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता. त्यांच्या आरोपांना आता आनंद परांजपे यांनी प्रत्युत्तर दिलंय. “अजित पवार यांनी जितेंद्र आव्हाडांसाठी दोन-दोनदा फोन केले होते. त्याचा साक्षीदार मी स्वतः आहे. मी पुण्यामध्ये स्वतः त्यांच्यासह आरोपी आहे. यामुळे अजित दादांवरती टीका करणे बंद करा”, असा गौप्यस्फोट आनंद परांजपे यांनी केला.

“पुण्याला दुर्दैवी अपघात झाला आणि दोन निष्पापांचा बळी गेला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही चौकशी निष्पक्षपणे व्हावी, अशा सूचना दिल्या आहेत. येरवडा तुरुंगातील अधिकारी आणि ससून हॉस्पिटलच्या दोन डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई झाली आहे. मात्र, विरोधकांना सातत्याने महायुतीतील तीन नेत्यांवर आरोप करण्याची सवय लागली आहे. खासकरून आमदार जितेंद्र आव्हाड यांना कायम उपमुख्यमंत्री अजित पवार दिसतात”, अशी टीका आनंद परांजपे यांनी केली. आनंद परांजपे यांची हातवारे करुन जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली.

आनंद परांजपे यांचा जितेंद्र आव्हाड यांना सवाल

“जितेंद्र आव्हाड यांनी काल अजित पवारांवर किती वेळा फोन केला, असा आरोप केला होता. मात्र अजित पवारांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की, सक्त कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. जितेंद्र आव्हाड यांच्यावर 354 गुन्हा दाखल झाला तेव्हा देखील अजित पवारांनी पोलिसांना फोन लावून चौकशी नीट करा. ते न करता कसा काय गुन्हा लावता? असे विचारले होते. हे आपण विसरलात का?”, असा प्रश्न आनंद परांजपे यांनी जितेंद्र आव्हाड यांना विचारला आहे. “अजित पवार यांचा संबंध जोडायचा आणि अजित पवारांवर खोटी टीका करता येईल हा त्यांचा केविलवाणी प्रकार आहे”, अशी टीका आनंद परांजपे यांनी केली.

“अजित पवार यांचा ब्रह्मा बिल्डर बरोबर पण नाव जोडण्याचा प्रयत्न केला. अनधिकृत बांधकामावर आव्हाड यांना फोटोशूट करायची सवय आहे. कळवामधील शरद पवार यांचे कार्यालयदेखील अनधिकृत आहे. याचे फोटो देखील आव्हाडांनी ट्विट करावा”, असं आव्हान आनंद परांजपे यांनी आव्हाडांना दिलं.

“जितेंद्र आव्हाड यांची नेहमीची खोटे नाटे आरोप करणे ही सवय आहे. स्वतःचं ठेवावं झाकून, दुसऱ्याचा बघावं वाकून ही जितेंद्र आव्हाड यांची प्रवृत्ती. कायम द्वेषाने ते अजित पवार यांच्यावर टीका करतात. अजित पवार यांनी आव्हाड्यांसाठी दोन-दोनदा फोन केले होते. त्याचा साक्षीदार मी स्वत: आहे. एकदा पुण्यामध्ये मी स्वतः त्यांच्यासह आरोपी होतो. यामुळे अजित दादांवरती टीका करणे बंद करा”, असं आनंद परांजपे म्हणाले.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना