Appa Londhe murder case : कुख्यात गुंड अप्पा लोंढे खूनप्रकरणी 6 जणांना जन्मठेप, मुख्य आरोपीसह 9 जणांची निर्दोष मुक्तता

| Updated on: May 06, 2022 | 11:29 AM

कुख्यात गुंड अप्पा लोंढे याच्या खून खटल्यातील मुख्य आरोपी गोकृरख कानकाटे याला या गुन्ह्यातून न्यायालयाने मुक्त केले. सबळ पुराव्याअभावी त्याची मुक्तता झाली. मात्र चो भाऊ लोंढे खूनप्रकरणी कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.

Appa Londhe murder case : कुख्यात गुंड अप्पा लोंढे खूनप्रकरणी 6 जणांना जन्मठेप, मुख्य आरोपीसह 9 जणांची निर्दोष मुक्तता
यूपीत 11 वर्षीपूर्वी घडलेल्या सामूहिक हत्याकांडात 16 जणांना जन्मठेप
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे : कुख्यात गुंड अप्पा लोंढे खून प्रकरणाचा (Appa Londhe murder case) निकाल जिल्हा सत्र न्यायालयाने अखेर दिला आहे. या खून खटल्यातील 6 आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने (Pune district court) जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर मुख्य आरोपी गोरख बबन कानकाटेसह 9 जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. 28 मे 2015 रोजी कुख्यात गुंड अप्पा लोंढे याची उरुळी कांचन परिसरात गोळ्या घालून हत्या (Murder) करण्यात आली होती. याप्रकरणी 15 जणांवर पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले होते. त्यानुसार न्यायालयाने या दुहेरी जन्मठेप व प्रत्येकी दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश एस. एन. शिरसीकर यांनी हा आदेश दिला. कट रचणे आणि खून करणे या कलमांखाली आरोपींना दोषी ठरवत न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे.

आरोपींचा कबुली जबाब ठरला महत्त्वाचा

संतोष भिमराव शिंदे (वय 34), निलेश खंडू सोलनकर (वय 30), राजेंद्र विजय गायकवाड (वय 24), आकाश सुनिल महाडिक (वय 20), विष्णू यशवंत जाधव (वय 37), नागेश लक्ष्मण झाडकर (वय 27) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहे. विशेष सरकारी वकील विकास शाह यांनी 42 साक्षीदार तपासले. त्यामध्ये पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी नोंदविलेला आरोपींचा कबुली जबाब, बॅलेस्टिक तज्ज्ञ डॉ. कुतुबुद्दीन मुलाणी यांची साक्ष आणि शव विच्छेदन अहवाल महत्त्वाचा ठरला.

मुख्य आरोपीची पुराव्याअभावी मुक्तता

परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे आरोपींना अधिकाधिक शिक्षा ठोठावण्यात यावी, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील शाह यांनी केला. न्यायालयाने तो मान्य केला. फिर्यादीतर्फे अॅड. सुहास कोल्हे यांनी कामकाज पाहिले. कुख्यात गुंड अप्पा लोंढे याच्या खून खटल्यातील मुख्य आरोपी गोकृरख कानकाटे याला या गुन्ह्यातून न्यायालयाने मुक्त केले. सबळ पुराव्याअभावी त्याची मुक्तता झाली. मात्र चो भाऊ लोंढे खूनप्रकरणी कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.