ईडीनं छापा टाकलेल्या अविनाश भोसलेंची मोठी गुंतवणूक; दक्षिण मुंबईत डुप्लेक्स फ्लॅटची खरेदी, किंमत किती?

| Updated on: Jun 15, 2021 | 4:20 PM

गेल्या काही महिन्यांपासून ईडीच्या रडारवर असलेले पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले (Avinash Bhosale) यांनी मुंबईत मोठी गुंतवणूक केली आहे.

ईडीनं छापा टाकलेल्या अविनाश भोसलेंची मोठी गुंतवणूक; दक्षिण मुंबईत डुप्लेक्स फ्लॅटची खरेदी, किंमत किती?
अविनाश भोसले
Follow us on

पुणे : गेल्या काही महिन्यांपासून ईडीच्या रडारवर असलेले पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले (Avinash Bhosale) यांनी मुंबईत मोठी गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीसाठी त्यांनी कोट्यवधी रुपये मोजले आहेत. (Avinash Bhosale big investment in Mumbai; Purchase of Duplex Flat in South Mumbai at Price of 103 crores)

मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश भोसले यांनी दक्षिण मुंबईत एक डुप्लेक्स फ्लॅट खरेदी केला आहे. अविनाश भोसले यांच्या ‘एबी’ज रिअलकॉन एलएलपी या कंपनीने ही गुंतवणूक केली आहे. या फ्लॅटसाठी त्यांनी 103 कोटी 80 लाख रुपये मोजले आहेत.

भोसले यांची ईडीविरोधात याचिका

बिल्डर अविनाश भोसले यांच्या विरोधात पुणे येथील जमिनीबाबत गुन्हा दाखल आहे. याबाबत ईडीने मनी लाँडरिंगप्रकरणी तपास सुरू केला आहे. या प्रकरणी ईडीने 11 फेब्रुवारीला भोसले यांच्याशी संबंधित चार ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. यावेळी अविनाश भोसले याचा मुलगा अमित भोसले याला ताब्यात घेऊन त्याची चार तास चौकशी केली होती.

या चौकशीनंतर 12 फेब्रुवारीला अविनाश भोसले आणि अमित भोसले यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र, हे दोघेही चौकशीसाठी हजर झाले नाहीत. यानंतर भोसले यांनी ईडीविरोधात गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई हायकोर्टात याचिका केली होती. तसेच 17 फेब्रुवारीला भोसले यांना ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितलं होतं.

कोण आहेत अविनाश भोसले?

  • रिक्षावाला ते रियल इस्टेट किंग असा अविनाश भोसले यांचा प्रवास आहे.
  • अविनाश भोसले हे राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे सासरे आहेत.
  • कोट्यवधी रुपयांचा एबीआयएल ग्रुपचे ते मालक आहेत.

नगर जिल्ह्यातल्या संगमनेर शहरातून अविनाश भोसले रोजगाराच्या शोधात पुण्यात आले. त्यांनी रिक्षाचालक म्हणून सुरुवात केली. पुण्यातील रास्ता पेठ भागात भाड्याच्या घरात राहून अविनाश भोसले यांनी रिक्षा व्यवसाय सुरु केला. अल्पावधीत रिक्षा भाड्याने देण्याचा व्यवसाय ते करु लागले. त्यानंतर अविनाश भोसले यांची ओळख बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींशी आणि राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागात ठेकेदारीच्या माध्यमातून काम करणाऱ्यांशी झाली. यानंतर अविनाश भोसले यांनी रस्ते तयार करण्याची लहान-मोठी कंत्राटं घेतली.

संबंधित बातम्या

रिअल इस्टेट किंग अविनाश भोसले यांची 10 तास चौकशी; ईडी कार्यालयातून बाहेर

ईडीनं छापा टाकलेले अविनाश भोसले कोण आहेत? रिक्षा चालक ते रिअल इस्टेटचे बादशाह, थक्क करणारा प्रवास, वाचा सविस्तर

(Avinash Bhosale big investment in Mumbai; Purchase of Duplex Flat in South Mumbai at Price of 103 crores)