रिअल इस्टेट किंग अविनाश भोसले यांची 10 तास चौकशी; ईडी कार्यालयातून बाहेर

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर ईडीने छापा मारल्याची घटना ताजी असतानाच आज ईडीने पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले यांची आठ तास चौकशी केल्याचं वृत्त आहे. (ED interrogates broker Avinash Bhosale in mumbai)

रिअल इस्टेट किंग अविनाश भोसले यांची 10 तास चौकशी; ईडी कार्यालयातून बाहेर
Follow us
| Updated on: Nov 27, 2020 | 9:11 PM

पुणे: शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर ईडीने छापा मारल्याची घटना ताजी असतानाच आज ईडीने पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले यांची सुमारे दहा सात चौकशी केली. FEMA कायद्यांतर्गत ही चौकशी करण्यात आली आहे. ईडीने अचानक केलेल्या या चौकशीमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. (ED interrogates broker Avinash Bhosale in mumbai)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ईडीने आज सकाळी अविनाश भोसले यांना मुंबईत बोलावून घेतले. त्यामुळे ते सकाळी 10 वाजता ईडीच्या कार्यालयात दाखल झाले. त्यानंतर त्यांची दहा तास चौकशी करण्यात आली. या चौकशी दरम्यान ईडीने त्यांच्याकडील काही कागदपत्रांची छाननी सुरू केल्याचं समजतं. रात्री उशिरा ईडी कार्यालयातून बाहेर पडल्यावर भोसले यांनी मीडियाला कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. अचानक झालेल्या या चौकशीमुळे एकच खळबळ उडाली आहे.

काल ईडीने पुण्यात काही ठिकाणी छापे मारले होते. त्यामुळे या संदर्भातच ईडीने भोसले यांना चौकशीसाठी बोलावले आहे का? याबाबतचं वृत्त समजू शकलं नाही. ईडीनेही त्यावर खुलासा केला नाही. त्यामुळे सस्पेन्स अधिकच वाढला होता. मात्र FEMA कायद्यांतर्गत त्यांची चौकशी करण्यात आल्याचं वृत्त आहे. यापूर्वीही आयकर विभागाने भोसले यांच्या घरावर छापा मारला होता. भोसले यांच्या पुणे आणि मुंबईतील 23 ठिकाणांवर आयकर विभागाने धाडी मारल्या होत्या.  (ED interrogates broker Avinash Bhosale in mumbai)

कोण आहेत अविनाश भोसले?

  • अविनाश भोसले यांना ओळखणाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ते 80च्या दशकात रिक्षा चालवत होते.
  • त्यानंतर त्यांचा बांधकाम व्यवसायाशी संबंध आला आणि ते सरकारी कंत्राटदार बनले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही.
  • आज ते कोट्यवधी रुपयांच्या एबीआयएल ग्रुपचे मालक आहेत. पुण्यात त्यांना रिअल इस्टेट किंग म्हणून ओळखले जाते.

बाणेरमध्ये व्हाईट हाऊस

  • पुण्याच्या बाणेर येथे भोसले यांचा पॅलेस आहे. व्हाईट हाऊस असं त्याचं नाव आहे.
  • सफेद रंगाच्या या पॅलेसचा लूक अमेरिकेच्या व्हाईट हाऊस सारखाच आहे.

कन्येच्या लग्नाला सेलिब्रिटींची मांदियाळी

  • अविनाश भोसले यांची कन्या स्वप्नाली हिचा विवाह माजी मंत्री, दिवंगत पतंगराव कदम यांचे चिरंजीव आणि काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांच्याबरोबर झाला होता.
  • पुण्यातील सर्वात रॉयल विवाह सोहळा म्हणून हा विवाह सोहळा ओळखला जातो.
  • या विवाहाला अभिनेता सलमान खान यांच्यासह तत्कालीन केंद्रीय मंत्रीही आले होते. (ED interrogates broker Avinash Bhosale in mumbai)

संबंधित बातम्या:

टॉप ग्रुप आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अमित चांदोळेंना तीन दिवसाची कोठडी; प्रताप सरनाईक यांना झटका

प्रताप सरनाईकांचे व्यावसायिक भागीदार असलेल्या अमित चांदोळेंना अटक, ईडीकडून सलग 12 तास चौकशी

Exclusive: प्रताप सरनाईक आणि संजय राऊत यांची ‘सामना’च्या कार्यालयात भेट; दीड तास गुप्त चर्चा

(ED interrogates broker Avinash Bhosale in mumbai)

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.