Bhima Koregaon Shaurya Din 2022| भीमा कोरेगाव शौर्य दिनाचे यंदा 204 वर्षात पदार्पण ; जाणून घ्या इतिहास

पेशवे व इंग्रज यांच्यात झालेल्या युद्धात इंग्रजांच्या बाजूने लढत असलेल्या महार रेजिमेंटमधील सैनिकांनी पेशव्यांच्या सैनिकांचा धुव्वा उडवला. अवघ्या 16 तासांमध्ये पेहशव्यांच्या सैन्याला जेरीस आणत पराभव पत्करण्यास भाग पडलं.

Bhima Koregaon Shaurya Din 2022| भीमा कोरेगाव शौर्य दिनाचे यंदा 204 वर्षात पदार्पण ; जाणून घ्या इतिहास
bhima koregaon
Follow us
| Updated on: Jan 01, 2022 | 7:00 AM

पुणे – पुणे शहरापासून 20 किमी अतंरावर असलेल्या कोरेगाव या गावात दरवर्षी 1 जानेवारीला देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो दलित अनुयायी येतात, निमित्त असते कोरेगाव भीमाच्या शौर्य दिनाचे . यंदा कोरेगाव भीमाच्या शौर्यदिनाला203 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने त्याचा घेतलेला  आढावा.

इतिहास काय सांगतो?

पुणे जिल्ह्यातील भीमा नदीच्या काठावर वसलेल कोरेगावचे गाव . या गावात 1जानेवारी 1818 या दिवशी कोरेगाव भीमाची लढाई झाली. या लढाईची इतिहासात पेशवे विरुद्ध इंग्रज अशी नोंद असली तरी तिचे स्वरूप काहीसे वेगळे आहे. पेशव्यांच्या विरुद्धातील या युद्धात ब्रिटिशांनी मोठ्या प्रमाणात महार समाजातील सैन्यबळाचा वापर केला.ब्रिटीशानी पुकारलेल्या या युद्धात सहभागी होत असत या असताना महार सैनिकांचा उद्देश हा इंग्रजाना युद्ध जिंकून देण्यापेक्षा जाचक पेशवाईलाचाप बसवण्याचा मुख्य ऊद्देश होता,अशी माहिती इतिहासकार देतात.

काही हजार सैन्याला आणले जेरीस

या पेशवे विरुद्ध इंग्रज युद्धात पेशव्यांच्या सैन्यांची संख्या इग्रजांच्या सैन्यांच्या काहीपट जास्त होती.   युद्धात पेशव्यांचे सैन्य हे हजारांच्या पटीत होते तर इंग्रजांचे सैन्य शेकड्यांच्या पटीत असलेले पाहायला मिळाल्याचे अभ्यासक सांगतात. मात्र इंग्रज सैन्यात असलेल्या महार रेजिमेंटमधील ‘बॉम्बे नेटिव लाइट इन्फेंट्री तुकडीच्या’  सैन्याचा समावेश होता . पण युद्धात या  तुकडीच्या  सैनिकांनी पेशव्यांच्या सैनिकांना मेटाकुटी आणल्याचेही सांगितले जाते.

16तासात उडवला धुव्वा पेशवे व इंग्रज यांच्यात झालेल्या युद्धात इंग्रजांच्या बाजूने लढत असलेल्या महार रेजिमेंटमधील सैनिकांनी पेशव्यांच्या सैनिकांचा धुव्वा उडवला. अवघ्या 16 तासांमध्ये पेहशव्यांच्या सैन्याला जेरीस आणत पराभव पत्करण्यास भाग पडलं. या काही तासांच्या लढाईत पेशव्यांच्या सैन्यानं आपली हार मानली. या युद्धात इंग्रजाचा विजय झाला म्हणजेच प्रामुख्याने महार रेजिमेंट जिंकली.

सैनिकांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून उभारला स्तंभ या युद्धात पेशव्यांच्या विरुद्ध महार रेजिमेंटच्या सैन्यांनी लढलेला समतेचा, हक्काच्या , न्यायाच्या लढाईत अनेकांनी आपले प्राण गमावले. युद्धात प्राणाची आहुती दिलेलया महार रेजिमेंटच्या सैनिकांच्या स्मृतीप्रीत्यर्थ भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभाची उभारणी करण्यात आली. या  स्तंभावर युद्धात वीरमरण पत्करलेल्या सैनिकाची नावे कोरण्यात आली आहेत.

 डॉ. आंबेडकरांनीही विजय स्तंभाला दिली होती मानवंदना शौर्याचे प्रतीक असलेल्या विजय स्तंभाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1 जानेवारी 1927  रोजी आपल्या अनुयायांसह भेट देत मानवंदना दिली होती. तेव्हापासून हजारो आंबेडकर दरवर्षी मोठ्या उत्साहाने भीमा कोरेगावला येतात.

75 फुटी विजयस्तंभाची  उभारणी ‘One of the Triumphs of the British Army of the Earth’ असे लिहित ब्रिटिशांनी शूर महार सैनिकांच्या स्मरणार्थ भीमा नदीच्या काठी ७५ फूट उंच विजयस्तंभ उभारला त्यावर 20  शहीद व3  जखमी महार सैनिकांची नावे कोरलेली असून स्तंभावर लिहिले आहेत.

Bhima Koregaon Shaurya Din Live Update | भीमा कोरेगाव शौर्यदिनानिमित्त विजयस्तंभावर आकर्षक रोषणाई, पोलिसांचा फौजफाटा तैनात

आजपासून बँकिंग व्यवहारात होणार ‘हे’ महत्त्वपूर्ण बदल, जाणून घ्या ग्राहकांवर काय होणार परिणाम?

OnePlus 10 Pro मध्ये 12GB रॅम, 32MP सेल्फी कॅमेरा मिळण्याची शक्यता, जाणून घ्या डिटेल्स

Non Stop LIVE Update
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.