AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वैष्णवी हगवणे प्रकरणात सर्वात मोठी बातमी; आणखी 5 जण घेतले ताब्यात, समोर आलं मोठं कारण

पुण्यातील विवाहीत तरुणी वैष्णवी हगवणे हिने आत्महत्या केली, या प्रकरणानं राज्यभरात खळबळ उडाली आहे, आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली असून, आणखी पाच जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

वैष्णवी हगवणे प्रकरणात सर्वात मोठी बातमी; आणखी 5 जण घेतले ताब्यात, समोर आलं मोठं कारण
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 26, 2025 | 9:30 PM
Share

पुण्यातील विवाहीत तरुणी वैष्णवी हगवने हिने 16 मे रोजी गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं, तिने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पोलिसांनी तिचा पती, दीर, सासू, सासरा आणि नंदण यांना अटक केली आहे, त्यानंतर आता मोठी बातमी समोर आली आहे.

वैष्णवीने आत्महत्या केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात तिचा पती, सासू आणि नंदण यांना लगेचच अटक केली होती. मात्र तिचा दीर आणि सासरा राजेंद्र हगवणे हा फरार होता. पोलिसांनी सापळा रचून या दोघांना अटक केली. दरम्यान आता त्यांना मदत करणं पाच जणांना चांगलंच भोवलं आहे, राजेंद्र हगवणे याला मदत करणाऱ्या पाच जणांवर पोलिसांनी कारवाई केली असून त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

राजेंद्र हगवणे फरार असताना त्याला ज्यांनी -ज्यांनी मदत केली त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात आरोपी राजेंद्र हगवणे याला मदत करणाऱ्या पाच जणांविरोधात बावधन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये कर्नाटकचे माजी ऊर्जा मंत्री वीर कुमार पाटील यांचा मुलगा प्रीतम पाटील, मावळ मधील फार्म हाऊसचे मालक बंडू फाटक, साताऱ्यातील पुसेगाव येथील राहुल जाधव, अमोल जाधव, तळेगांव दाभाडे येथील मोहन भेगडे यांचा समावेश आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून,  या पाचही जणांना बावधन पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे, त्यांच्या अटकेची प्रक्रिया सुरू आहे.

नेमकं काय आहे प्रकरण? 

पुण्यातील तरुणी वैष्णवी हगवणे हीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे, विशेष म्हणजे तिचा प्रेमविवाह झाला होता, मात्र लग्नानंतर तिचा सासरच्यांनी छळ केल्याचा आरोप होत आहे. वैष्णवीच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी या प्रकरणात तिचे सासू, सासरे, दीर आणि नंदण यांना अटक केली आहे. वैष्णवीने आत्महत्या केल्यानंतर तिचा सासरा राजेंद्र हगवणे हा तिचा मृतदेह पाहण्यासाठी आपल्या काही कार्यकर्त्यांसह रुग्णालयात आला होता, मात्र गुन्हा दाखल होणार असल्याची कुणकुण लागताच तो फरार झाला, त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली, दरम्यान तो फरार असताना ज्यांनी -ज्यांनी त्याला मदत केली, त्या सर्वांवर आता पोलिसांनी कारवाई केली आहे, या प्रकरणात आणखी पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Follow Us
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...