आपल्याच सरकारच्या विरोधात भाजप कार्यकर्ते आक्रमक, देवेंद्र फडणवीस यांना दिला आंदोलनचा इशारा

Devendra Fadanvis : नेहमी विरोधकांच्या आंदोलनाला समोरे जावे लागणाऱ्या सत्ताधाऱ्यांना आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलनाचा इशारा कधी मिळत नाही. परंतु भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना सोलापुरातील भाजप कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे.

आपल्याच सरकारच्या विरोधात भाजप कार्यकर्ते आक्रमक, देवेंद्र फडणवीस यांना दिला आंदोलनचा इशारा
Devendra Fadanvis and bjp worker
Follow us
| Updated on: May 26, 2023 | 10:44 AM

सागर सुरवसे, सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे नेते अन् राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी सोलापूर दौऱ्यावर होते. हा दौरा त्यांचा चांगलाच चर्चेत राहिला. राज्यातील शेतकरी सध्या अनेक अडचणींचा सामना करत आहे. त्यातच शेतमालाला बाजारभाव मिळत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांचा ताफा अडवण्याचा थेट इशारा दिला होता. यामुळे या दौऱ्यापूर्वी अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिवानंद झळके यांना ताब्यात घेण्यात आले होते. आता भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनीच फडणवीस यांना आंदोलनाचा इशारा दिला आहे. तसेच पुढे जाऊन सरकारविरोधात उपोषण करणार असल्याचे म्हटले आहे.

काय आहे प्रकरण

सोलापुरातील नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी झाले. यावेळी त्यांना निवेदन देण्यासाठी आलेल्या भाजप नेत्याने फडणवीस यांनाच आंदोलनाचा इशारा दिला. सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड हायवेच्या मोबदल्यासाठी भाजप नेत्याच्या शिष्टमंडळाने फडणवीसांना निवेदन देत हा इशारा दिला.

हे सुद्धा वाचा

काय आहे मागणी

बहुचर्चीत सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड हायवे अक्कलकोट तालुक्यातून जात आहे. यासाठी भूसंपादनाच्या नोटीस देखील निघाल्या आहेत. या भूसंपादनासाठी वाढीव मोबदला देण्याची मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली आहे. यावेळी भाजपच्याच कार्यकर्त्यांनी वाढीव मोबदला मिळावा यासाठी सरकारविरोधात आंदोलनाचा इशाराही दिला.

कमी रक्कम देत असल्याचा आरोप

बहुचर्चीत सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड हायवेसाठी भूसंपादन केले जात आहे. या भूसंपादनासाठी अत्यंत कमी रक्कम देण्यात येणार असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे. त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन केली होती. तेच गाऱ्हाण अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर देखील मांडले.

भाजप नेत्याने दिला इशारा

शेतकऱ्यांना मोबदला मिळण्याच्या मागणीसाठी आपल्याच सरकारविरोधात आंदोलन करण्याचा इशारा भाजप नेत्याने दिला. अक्कलकोट तालुक्यातील भाजपचे नेते, पंचायत समितीचे माजी विरोधी पक्षनेते बाळासाहेब मोरे यांनी सरकार विरोधात आंदोलन करावे लागेल असा इशारा दिलाय. चेन्नई सुरत हायवेला दिला जाणारा मोबदला अत्यंत तुटपुंजा आहे. यावर बैठक लावून तातडीने मार्ग काढायला हवा, अशी मागणी त्यांनी केली. जर यावर मार्ग निघाला नाही तर आम्ही पक्षाचे कार्यकर्ते असूनही सरकार विरोधात आझाद मैदानावर उपोषणाला बसू, अशा शब्दात मोरे यांनी फडणवीस यांना इशारा दिला.

जळगावात रेल्वे अपघातातील ११ बळी प्रवाशांची ओळख पटविण्याचे काम सुरु
जळगावात रेल्वे अपघातातील ११ बळी प्रवाशांची ओळख पटविण्याचे काम सुरु.
जळगावात 'पुष्पक'मधून थेट रूळावर उड्या अन् दुसऱ्या ट्रेननं उडवलं
जळगावात 'पुष्पक'मधून थेट रूळावर उड्या अन् दुसऱ्या ट्रेननं उडवलं.
धसांकडून परळीतील दोन खुणांचा खुलासा, एकाची हत्या तर एकीला जीवंत जाळलं
धसांकडून परळीतील दोन खुणांचा खुलासा, एकाची हत्या तर एकीला जीवंत जाळलं.
सैफच्या हॉस्पिटल बिलावरून नवा वाद, सर्वसामान्यांना 5 लाख देत नाही अन्
सैफच्या हॉस्पिटल बिलावरून नवा वाद, सर्वसामान्यांना 5 लाख देत नाही अन्.
निकष धुडकावून 1500 रूपये घेतले, अशा 'बहिणीं'साठी सरकारचा मोठा निर्णय
निकष धुडकावून 1500 रूपये घेतले, अशा 'बहिणीं'साठी सरकारचा मोठा निर्णय.
अखेर सैफनं 'त्या' रिक्षाचालकाची भेट घेतली, फोटो आला समोर
अखेर सैफनं 'त्या' रिक्षाचालकाची भेट घेतली, फोटो आला समोर.
Beed Case BIG Breaking: सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार
Beed Case BIG Breaking: सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार.
'उदय सामंत भटकती अन् लटकती आत्मा, दावोसला आमदार फोडायला गेलेत'
'उदय सामंत भटकती अन् लटकती आत्मा, दावोसला आमदार फोडायला गेलेत'.
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ.
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'.