FTII : एफटीआयआयच्या वसतिगृहात लटकलेल्या अवस्थेत आढळून आला विद्यार्थी, आत्महत्येचं कारण अस्पष्ट; तपास सुरू

| Updated on: Aug 05, 2022 | 1:44 PM

प्रथमदर्शनी ही आत्महत्या असल्याचे दिसत आहे. त्यादृष्टीने पुढील तपास सुरू असल्याचे पुणे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

FTII : एफटीआयआयच्या वसतिगृहात लटकलेल्या अवस्थेत आढळून आला विद्यार्थी, आत्महत्येचं कारण अस्पष्ट; तपास सुरू
Follow us on

पुणे : फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) येथे एका 32 वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. आज सकाळी एका 32 वर्षीय विद्यार्थ्याचा मृतदेह वसतिगृहाच्या खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. प्रथमदर्शनी ही आत्महत्या (Suicide) असल्याचे दिसत आहे. त्यादृष्टीने पुढील तपास सुरू असल्याचे पुणे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. लॉ कॉलेज रोडवर एफटीआयआय ही संस्था असून या इन्स्टिट्यूटमध्ये देशभरातून लाखो विद्यार्थी कला, मनोरंजन विश्वात करिअर करण्याच्या हेतूने अभ्यासक्रमास प्रवेश घेत असतात. या संस्थेतून आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षण पूर्ण करत अभिनय (Acting) क्षेत्रात आपले नाव कमावले आहे. अनेक कलाकार या संस्थेने घडवले आहे. मात्र अनेकजण संघर्ष करतानाही पाहायला मिळत आहेत. आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

टोकाचे पाऊल का उचचले, याचा तपास

आज सकाळी निदर्शनास आलेल्या आत्महत्येच्या घटनेने एफटीआयआयसह शहरात खळबळ उडाली आहे. इन्स्टिट्यूटमधील वसतिगृहात विद्यार्थ्याने आत्महत्या केली. संबंधित तरूण 32 वर्षीय असून त्याने आत्महत्या का केली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याविषयी सकाळी पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. प्रथमदर्शनी ही आत्महत्या असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मात्र या विद्यार्थ्याने हे टोकाचे पाऊल का उचलले याविषयीचा तपास पोलिसांनी आता सुरू केला आहे. त्याने सुसाइट नोट लिहिली का, तो तणावात होता का, याचाही तपास पोलिसांकडून केला जाणार आहे.

हे सुद्धा वाचा

केंद्र सरकारची स्वायत्त संस्था

एफटीआयआय ही पुणे शहरातील चित्रपट आणि दूरचित्रवाणी माध्यमांविषयी प्रशिक्षण देणारी एक संस्था आहे. ही भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची एक स्वायत्त अशी संस्था आहे. पूर्वीच्या प्रभात फिल्म्स कंपनीच्या प्रांगणात ही संस्था वसलेली आहे. या संस्थेची स्थापना 1960 साली करण्यात आली. एफटीआयआय ही चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रातील जगातील आघाडीच्या शाळांची संस्था असलेल्या इंटरनॅशनल लायझन सेंटर ऑफ स्कूल ऑफ सिनेमा अँड टेलिव्हिजन (CILECT)ची सदस्य आहे.