Building Slab Collapse| येरवड्यातील बांधकाम दुर्घटनेप्रकरणी बांधकाम व्यवसायिकावर गुन्हा दाखल ; जिल्ह्याधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती करणार चौकशी

| Updated on: Feb 04, 2022 | 7:22 PM

रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास बांधकाम साइटवर लोखंडी जाळी बसविण्याचे काम सुरू होते. या ठिकाणी दहा ते पंधरा मजूर काम करत होते. अचानक काम सुरू असताना लोखंडी जाळी खाली काम करणाऱ्या मजुरांच्या अंगावर कोसळली. दहा जण अडकले होते.

Building Slab Collapse| येरवड्यातील बांधकाम दुर्घटनेप्रकरणी बांधकाम व्यवसायिकावर गुन्हा दाखल ; जिल्ह्याधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती करणार चौकशी
अमिताभ गुप्ता
Follow us on

पुणे – येरवड्यातील शास्त्रीनगर येथे बांधकाम सुरु असलेल्या इमारतीचे स्लब कोसळून(Pune Building Slab Collapse) झालेल्या दुर्घटने प्रकरणी  पोलिसांनी ब्लू ग्रास बिझनेस पार्क कंपनीसह अहलुवालिया कन्स्ट्रक्शनवर सदोष मनुष्यवधाचा सह इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता (Police Commissioner Amitabh Gupta) यांनी दिली. जखमी कामगाराने दिलेल्या तक्रारीवरून  बांधकाम व्यासायिकावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुर्घटनेतील सर्व मृत व जखमी हे परराज्यातील एकाच गावातील आहेत. गुरुवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास बांधकाम साइटवर लोखंडी जाळी बसविण्याचे काम सुरू होते. या ठिकाणी दहा ते पंधरा मजूर काम करत होते. अचानक काम सुरू असताना लोखंडी जाळी खाली काम करणाऱ्या मजुरांच्या अंगावर कोसळली. दहा जण अडकले होते. या दुर्घटनेनंतर(accident) सुमारे दोन तास सुरू असलेल्या मदत कार्यानंतर दुर्घटनेत अडकलेल्या मृत व गंभीर जखमी मजुरांना बाहेर काढण्यात आले.

पाच लोकांचा जागीच मृत्यू
ब्लू ग्रास बिझनेस पार्क येथील बांधकाम साइटवर स्लॅप साठी तयार करण्यात आलेली जाळी गुरुवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास मजुरांच्या अंगावर कोसळली. या दुर्घटनेत पाच मजूर जागीच ठार झाले तर इतर पाच जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी बांधकाम साइटवर सुरक्षेच्या योग्य उपाययोजना न करता मजुरांचा मृत्यूस गंभीर जखमी करण्यासाठी कारणीभूत म्हणून ब्लू ग्रास बिझनेस पार्क कंपनीसह अहलुवालिया कन्स्ट्रक्शन यांच्या वर सदोष मनुष्यवधाचा सह इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन

पोलिसांनी एकत्रीकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली 2020 मधील विनियम क्र सी 8.5  अंतर्गत माननीय जिल्ह्याधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तांत्रिक तथ्य शोधन समिती स्थापन करण्यात आली आहे. तसेच कॉलेज ऑफ इंजीनीरींग कडून घटनेबाबत स्वतंत्र अहवाल मागवण्यात आला आहे. मालक फारूक फ्रामजी वाडिया व इतर , आर्क्रिटेक – दिनेश चंद्रात्रे, स्टक्चलर सल्लागार स्टर्लिंग इंजिनिअर कन्स्टलन्सी सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड , सल्लागार प्रासाद भोर , कंत्रादार मेसर्स ,अहलुवालिया कन्स्ट्रक्शन , दिल्ली हे नावे समोर आली आहेत.

अनेक आजारपणात रामबाण औषध ठरते काळे मिठ! वाचा काळ्या मिठाचे थक्क करणारे फायदे

‘ट्रॅफिकमुळे तीन टक्के घटस्फोट होतात’, अमृता फडणवीसांचा दावा; सत्ताधाऱ्यांचं जोरदार प्रत्युत्तर, महिला वकिलांचं मत काय?

सॅनिटायझर, पीपीई किट्स विक्रीच्या धंद्याचं अमिष दाखवून एक कोटीचा गंडा; मित्रांनीच केला मित्राचा घात