AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे विमानतळावर तब्बल दहा कोटींचा गांजा जप्त, दोघांना घेतलं ताब्यात

पुणे विमानतळावर तब्बल दहा कोटी रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात चौकशीसाठी दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

पुणे विमानतळावर तब्बल दहा कोटींचा गांजा जप्त, दोघांना घेतलं ताब्यात
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 14, 2025 | 8:52 PM
Share

पुण्यातून मोठी बातमी समोर येत आहे, पुणे विमानतळावर तब्बल दहा कोटी रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर विभागाकडून (डिरेक्टोरेट रेव्हेन्यू इंटलिजन्स) दहा कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी बँकॉकहून आलेल्या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांची चौकशी सुरू आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की,  पुणे विमानतळावर तब्बल दहा कोटी रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर विभागाकडून दहा कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी बँकॉकहून आलेल्या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.  बँकॉकवरून आलेले दोघे आरोपी आज पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. त्यांच्याकडे हायड्रोपोनिक गांजा असल्याची माहिती ‘डीआरआय’च्या मुंबई पथकाला मिळाली होती. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार  पथकातील अधिकाऱ्यांनी विमानतळावर दोघांची चौकशी केली. त्यांच्याकडे असलेल्या सामानाची तपासणी करण्यात आली. तेव्हा प्लास्टिकच्या पिशवीत हायड्रोपोनिक गांजा आढळून आला आहे.

चौकशीत मुंबईतील एकाकडे हायड्रोपोनिक गांजा विक्रीसाठी देण्यात येणार असल्याची माहिती दोघांनी दिली. त्यानुसार ‘डीआरआय’च्या पथकाने मुंबईतून देखील एकाला ताब्यात घेतले आहे. या कारवाईत दहा किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला असून, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत दहा कोटी रुपये असल्याची माहिती ‘डीआरआय’च्या अधिकाऱ्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

आरोपींची चौकशी सुरू 

बँकॉकवरून येणाऱ्या दोन प्रवाशांकडे मोठ्या प्रमाणात गांजा असल्याची माहिती ‘डीआरआय’च्या मुंबई पथकाला मिळाली होती. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार  पथकातील अधिकाऱ्यांनी विमानतळावर दोघांची चौकशी केली. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे गांजा आढळून आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या गांजाची किंमत तब्बल दहा कोटी रुपये असल्याची माहिती समोर आली आहे, दरम्यान हा गांजा जप्त करण्यात आला असून, आरोपींची चौकशी सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...