AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केंद्राचं आरोग्य पथक पुण्याच्या झिकाबाधित गावात, पाहणीनंतर प्रशासकिय अधिकाऱ्यांसोबत बैठक, केंद्राला अहवाल देणार

केंद्राचं आरोग्य पथक झिकाबाधित पुरंदरच्या बेलसर गावात दाखल झालं आहे. या पथकाने पहिल्यांदा गावाची पाहणी केली. पाहणीनंतर पथकाची आरोग्य अधिकाऱ्यांशी बैठक होत आहे.

केंद्राचं आरोग्य पथक पुण्याच्या झिकाबाधित गावात, पाहणीनंतर प्रशासकिय अधिकाऱ्यांसोबत बैठक, केंद्राला अहवाल देणार
केंद्राचं आरोग्य पथक पुरंदरच्या बेलसर गावात दाखल झालं आहे.
| Edited By: Akshay Adhav | Updated on: Aug 05, 2021 | 11:48 AM
Share

पुरंदर :  केंद्राचं आरोग्य पथक झिकाबाधित पुरंदरच्या बेलसर गावात दाखल झालं आहे. या पथकाने पहिल्यांदा गावाची पाहणी केली. पाहणीनंतर पथकाची आरोग्य अधिकाऱ्यांशी बैठक होत आहे. या बैठकीत केंद्रीय पथक स्थानिक अधिकाऱ्यांकडून माहिती घेत आहे.

केंद्राचं तीन जणांचं पथक बेलसर गावाची पाहणी करत आहे. दिल्लीतून सर्वेक्षण करण्यासाठी कुटुंब कल्याण मंत्रालयानं हे पथकं पाठवलं आहे. दिल्लीच्या लेडी हार्डींग वैद्यकीय महाविद्यालय स्त्रीरोगतज्ज्ञ, आणि राष्ट्रीय हिवताप संशोधन केंद्रातील किटकतज्ज्ञांचा या पथकात समावेश आहे. बेलसर गावाची पाहणी करुन हे पथक केंद्राला अहवाल देणार आहे.

बेलसरमध्ये झिकाचा पहिला रुग्ण, जेजुरीकरांची चिंता वाढली

बेलसरमध्ये झिकाचा रुग्ण आढळल्यानं जेजुरीकरांची चिंता वाढली आहे. त्यामुळे जेजुरी व परिसरातील गावांमध्ये सर्वेक्षण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून जेजुरी परिसरात डेंग्यु, चिकन गुनिया आजारानं घातलं थैमान घातलं आहे.

जेजुरीतील ग्रामीण रुग्णालय केवळ कोरोना उपचार आणि लसीकरणापुरतेच उरले आहेत की काय, अशी विचारणा आता नागरिक करत आहेत. ग्रामीण रुग्णालयात इतर आजारांवर उपचार बंद असल्याने नागरिक संतप्त झालेले पाहायला मिळत आहेत.

झिकाचा पहिला रुग्ण पुरंदरच्या बेलसरमध्ये

राज्याचे सर्वेक्षण अधिकारी डॉ.प्रदीप आवटे यांनी 30 जुलै रोजी महाराष्ट्रात झिका विषाणूचा पहिला रुग्ण आढळल्याची माहिती दिली. झिका विषाणूचा संसर्ग झालेल्या 50 वर्षीय महिला रुग्णाची हिस्ट्री तपासणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. झिकाचा संसर्ग झालेल्या रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती महाराष्ट्राच्या आरोग्य विभागानं दिली आहे.

झिका विषाणुची लक्षणं कोणती?

झिकाचे पहिले लक्षण म्हणजे ताप येणे, अंगदुखणे, अंगावर लाल रंगाचे चट्टे येणे तसेच या व्हायरल दरम्यान प्रचंड डोकेदुखी होते, डोळे लाल होणे, अशक्तपणा आणि थकवा हे देखील या व्हायरलचे प्रमुख लक्षण आहे. मात्र, सुरूवातीला आलेल्या तापावरून झिका व्हायरल कळणे थोडे कठीण आहे.

झिकापासून वाचण्यासाठी काय करावं

झिका व्हायरसवर असे काही विशिष्ट औषध नाहीये. मात्र, झिका व्हायरसच्या दरम्यान आपण जास्तीत-जास्त पाणी पिले पाहिजे. झिका व्हायरलमध्ये साधेदुखीचा त्रास अधिक होतो. यामुळे आपण जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. झिका व्हायरसमध्ये जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करा.

झिका व्हायरसवर लस किंवा उपचार नाही

सध्या झिका व्हायरसला कोणतीही लस किंवा उपचार नाही. झिका व्हायरसमध्ये आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर गंभीर परिणाम होतो. गर्भवती महिलांमध्ये हा संसर्ग विकसनशील गर्भास गंभीरपणे हानी पोहोचवू शकतो आणि जन्मजात विसंगती होऊ शकतात. हा झिका व्हायरस डासांमुळे होतो.

(Center health team visit Belsar village of Purandar infected with Zika virus)

हे ही वाचा :

महाराष्ट्रावर नवं संकट, राज्यात झिका विषाणूचा पहिला रुग्ण, आरोग्य यंत्रणा ॲलर्ट

झिका विषाणूचा धोका वाढला, केरळात एका शहरात 14 रुग्ण, तामिळनाडू सरकार अलर्ट, सीमेवर बंदोबस्त वाढवला

कोरोनानंतर आता झिका व्हायरसचा धोका वाढला, पाहा लक्षणं कोणती आणि लागण कशी होते?

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?