पुणे : खेड येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) महत्वाच्या नेत्यांनी आज भाजपात प्रवेश केला. यावेळी बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ बंद पाडू, असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी केलं. बारामतीनंतर खेड आळंदीही आमच्या टार्गेटवर असल्याचं ते म्हणाले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली ठोंबरे (Rupali Thombre) म्हणाल्या, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना तातडीने कुणीतरी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी घेऊन जावे. त्यांना राष्ट्रवादीच्या विरोधात सातत्याने झटके येत असतात.