मोठी बातमी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे पुण्यात इमर्जन्सी लॅडिंग, कारण…

श्रावणातील शेवटचा सोमवार असल्याने श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत आहे. अनेक भाविकांनी धुकं, पाऊस असतानाही दर्शन घेण्यासाठी गर्दी केली आहे.

मोठी बातमी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे पुण्यात इमर्जन्सी लॅडिंग, कारण...
| Updated on: Sep 02, 2024 | 1:06 PM

CM Eknath Shinde Helicopter Landing : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं आहे. खराब हवामानामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर पुण्यातील लांडेवाडी परिसरात उतरवण्यात आले आहे. एकनाथ शिंदे हे भिमाशंकरमध्ये दर्शनसाठी जात होते. मात्र या खराब हवामानाचा फटका एकनाथ शिंदेंच्या दौऱ्याला बसला आहे.

पुण्यातील लांडेवाडीत उतरवण्यात आलं हेलिकॉप्टर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे सहकुटुंब दर्शनासाठी जाणार आहेत. आज श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार असल्याने एकनाथ शिंदे हे श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी जात आहेत. मात्र भीमाशंकर इथे खराब हवामान आहे. यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडीत उतरवण्यात आले.

खराब हवामानाचा फटका

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या भीमाशंकर परिसरात मोठ्या प्रमाणामध्ये धुके पाहायला मिळत आहे. याच खराब हवामानाचा फटका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही बसला आहे. भीमाशंकरला खराब हवामान असल्यामुळे मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर लांडेवाडीत उतरवण्यात आले आहे. शासकीय प्रोटोकॉलनुसार, एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर भीमाशंकर या ठिकाणी उतरवण्यात येणार होते. मात्र भिमाशंकरमध्ये धुकं, पाऊस असे खराब हवामान आहे. या हवामानामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी उतरविण्यात आले.

दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी

एकनाथ शिंदे हे श्रावण महिन्यातील सोमवारी श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी येतात. यंदाही अखेरच्या श्रावण सोमवारी एकनाथ शिंदे हे दर्शनासाठी गेले आहेत. दरम्यान श्रावणातील शेवटचा सोमवार असल्याने श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत आहे. अनेक भाविकांनी धुकं, पाऊस असतानाही दर्शन घेण्यासाठी गर्दी केली आहे. हर हर महादेवचा जयघोष करत भाविक रांगेत उभे आहेत

तसेच बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भिमाशंकरला पहाटे मुख्य शिवलिंगावर दुग्धाभिषेक, महाआरती शंखनाद करण्यात आला. त्यानंतर भाविकांसाठी हे मंदिर खुलं करण्यात आलं. मुख्य शिवलिंगावर विविध फुलमाळांची आकर्षक सजावट करण्यात आली. तसेच सध्या हर हर महादेव, ओम नम: शिवाय असा जपही या ठिकाणी सुरु आहे.