AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Modi In Pune: पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याला काँग्रेस-राष्ट्रवादीचा विरोध, काळे झेंडे दाखवण्यासाठी अलका चौकात निदर्शने सुरू; पोलिसांचा मोठा बंदोबस्त

अलका चौकात ठिय्या मांडता हे आंदोलन सुरु आहे. यावेळी काँग्रेसकडून मोदींच्या निषेधाच्या घोषणाही दिल्या जात आहेत. या आंदोलनाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. दुसरीकडे पुणे स्टेशन परिसरात राष्ट्रवादीकडून(NCP) आंबेकडकर पुतळ्याजवळ मोदींचा निषेध करण्यासाठी काळे कपडे व मास्क घालून हे आंदोलन करण्यात येत आहे. हातात फलक घेऊन मूक आंदोलन करत निषेध केला जात आहे.

Modi In Pune: पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याला काँग्रेस-राष्ट्रवादीचा विरोध, काळे झेंडे दाखवण्यासाठी अलका चौकात निदर्शने सुरू; पोलिसांचा मोठा बंदोबस्त
congress Andolan
| Edited By: | Updated on: Mar 06, 2022 | 10:29 AM
Share

पुणे – पुणे मेट्रो प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी(Prime Minister Narendra Modi) शहरातच पोहचत असताना, शहरातील अलका चौकात काँग्रेसकडून (Congress) काळे झेंडे व काळे कपडे घालत मोदींचा निषेध केला जात आहे. महाराष्ट्रामुळे देशात कोरोना पसरला असल्याचे वक्तव्य त्यांनी केले होते. याचा निषेध करत हे आंदोलन केलं जात आहे. अलका चौकात ठिय्या मांडता हे आंदोलन सुरु आहे. यावेळी काँग्रेसकडून मोदींच्या निषेधाच्या घोषणाही दिल्या जात आहेत. या आंदोलनाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. दुसरीकडे पुणे स्टेशन परिसरात राष्ट्रवादीकडून(NCP) आंबेकडकर पुतळ्याजवळ मोदींचा निषेध करण्यासाठी काळे कपडे व मास्क घालून हे आंदोलन करण्यात येत आहे. हातात फलक घेऊन मूक आंदोलन करत निषेध केला जात आहे. मोदींच्या आंदोलनाचा निषेध करण्यासाठी लावण्यात आलेल्या बॅनर काढण्यावरूनही कार्यकर्ते व पोलिसांच्यामध्ये बाचाबाची झाली होती. त्यानंतर राष्ट्रवादीने हे आंदोलन सुरु केले आहे.

मोदींच्या हस्ते मेट्रोचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी पुणे येथील विमानतळावर पोहचतील. तिथं त्यांचा स्वागत समारंभ झाल्यानंतर ते पुणे महानगरपालिकेत उभारण्यातआलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी 11 वाजता पोहोचतील. त्यानंतर 11.30 वाजता पुणे मेट्रोचं उद्घाटन करून ते गरवारे स्टेशन पासून मेट्रोने प्रवास करणार आहेत. एमआयटी कॉलेजमध्ये विविध विकास योजनांचं उद्घाटन झाल्यानंतर तिथं त्यांची जाहीर सभा देखील होणार आहे. सभा संपल्यानंतर आर के लक्ष्मण गॅलरीचं उद्घाटन ते दीड वाजता करतील. त्यानंतर तीन वाजता ते पुण्यातून रवाना होतील अशी माहिती प्राथमिक माहिती आहे.

महापालिका निवडणुकीत पराभव होण्याची भाजपला भीती पंतप्रधान हे महापालिकेतील कार्यक्रमानंतर जंगली महाराज रस्त्याने गरवारे मेट्रो स्थानकापर्यंत जाणार आहेत. त्यामुळे कॉंग्रेसने झाशीच्या राणी पुतळा परिसरात आंदोलनात परवानगी मागितली होती. मात्र, ती परवानगी नाकारण्यात आली पाच वर्षे निष्क्रीय राहिल्याने महापालिका निवडणुकीत पराभव होण्याची भीती भाजपला वाटत आहे. पुण्यातील भाजप नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा ठरविला आहे. पण हा भाजपचा प्रयत्न केविलवाणा आहे. अशी टीका प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केली आहे.

Share बाजार सारखा आपटतोय! गुंतवणूक करण्याची हीच खरी सुवर्ण संधी? काय सांगतात तज्ज्ञ? IND vs PAK, WWC 2022: स्नेह राणा-पूजा वस्त्राकरची जबरदस्त फलंदाजी, भारताने पाकिस्तानला दिलं 245 धावांचं लक्ष्य

‘चांदनी’ ची झलक रसिकांना कायम पाहायला मिळणार, कठोर परिश्रम करत जान्हवी कपूरचे बॉलिवूडमध्ये स्थान कायम… Happy Birthday गुंजन सक्सेना

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.