AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona infection in students at MIT Pune| पुण्यातील एमआयटी शैक्षाणिक संस्थेतील 13 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

एमआयटीमध्येही याचा नियमाचे पालन करत विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात होता. मात्र लसीचे डोस पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यालाच पुन्हा कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले. त्याचबरोबर त्याच्या संपर्कांत आलेल्या 15विद्यार्थ्यांपैकी 13जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तर आठ जणांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. उर्वरित चार विद्यार्थ्यांचा अहवाल अद्याप आलेला नाही.

Corona infection in students at MIT Pune| पुण्यातील एमआयटी शैक्षाणिक संस्थेतील 13  विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण
संग्रहित छायाचित्र.
| Edited By: | Updated on: Dec 27, 2021 | 1:16 PM
Share

पुणे : राज्यातील ओमीक्रॉन रुग्णांची रुग्णसंख्या वाढत असतानाच दुसरीकडं पुण्यातील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. एकाचवेळी 13 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्यानं खळबल उडाली आहे. कोथरूड कॅम्पसमध्येच ही घटना घडली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा शैक्षणिक संस्थेमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याचे निश्चित झाले आहे. यामुळे येत्या काळात ऑफलाईन वर्ग सुरु करत असताना कोरोनाची नियमावलीचे काटेकोर पालन करावे लागणार आहे.

नेमके काय घडले राज्य सरकार व विद्यापीठ अनुदान आयोगानं दिलेल्या कोरोनाच्या नियमावलीनुसारच शहारातील शैक्षाणिक संस्थांमध्ये लसीकरणाचे दोन डोसपूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जात आहे. एमआयटीमध्येही याचा नियमाचे पालन करत विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात होता. मात्र लसीचे डोस पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यालाच पुन्हा कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले. त्याचबरोबर त्याच्या संपर्कांत आलेल्या 25 विद्यार्थ्यांपैकी 13जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तर आठ जणांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. उर्वरित चार विद्यार्थ्यांचा अहवाल अद्याप आलेला नाही.

विद्यापीठ घेतय खबरदारी

कोरोनाच्या नियमावलीचे पालन करत , विद्यार्थ्यांच्या बाबत योग्य ती खबरदारी घेण्याचे काम एमआयटी विद्यापीठ करत आहे. या घटनेच्या दरम्यान अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षात शिकणारे विद्यार्थी वर्कशॉपमध्ये स्पर्धेची तयारी करत होते. त्याच वेळी कोरोनाबाधित विद्यार्थ्या संपर्कात इतर विद्यार्थी आले. यानंतर सर्व विद्यार्थ्यांना कोरोना चाचणी करून घेण्यास सांगण्यात आले. मात्र या घटनेनंतरही कॅम्पस सुरूचया असून, कोविडच्या नियमानुसार विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात असल्याची माहिती एमआयटी विद्यापीठाचे कुलसचिव प्रशांत दवे यांनी दिली आहे.

पालिका प्रशासन सर्तक शहरात सद्यस्थितीला कोरोनाची रुग्ण संख्या शंभरच्या वर गेली आहे. गेल्या आठवड्यातील शेवटच्या तीन दिवसात कोरोना रुग्णांनी शंभरचा टप्पा ओलांडल्याचे दिसून आले आहे. रविवारी शहरात कोरोनाचे 132 रुग्ण आढळून आले. याबाबत प्रशासन सर्तक झाले आहे. आवश्यकती सर्व खबरदारी घेतली जात असून कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी केली जात आहे.

मास्क नाही, तर भाजी नाही; ओमिक्रॉनची झळ थेट किचनपर्यंत, काय प्रकरण वाचा!

Happy Birthday Salman Khan | ‘दबंग खान’चं वयाच्या 56व्या वर्षात पदार्पण, अनेकांचा ‘गॉडफादर’ ठरलेल्या सलमानची जीवनशैली माहितेय का?

Narayan Rane | अज्ञातवासात जायची आम्हाला गरज नाही, नितेश राणे सिंधुदुर्गातच आहेत – नारायण राणे

लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.