स्मशानात या जोडप्याने केले लग्न, स्मशानात लग्न करण्यामागे कारण आहे तरी काय?

Pune News : राज्यात झालेल्या एका आगळ्या वेगळ्या लग्नाची चर्चा सध्या सुरु आहे. हे लग्न कुठे झाले याचा विचारही तुम्हाला करता येणार नाही. हे लग्न स्मशानात झाले आहे. का घेतला त्यांनी स्मशानात लग्न करण्याचा निर्णय...

स्मशानात या जोडप्याने केले लग्न, स्मशानात लग्न करण्यामागे कारण आहे तरी काय?
Follow us
| Updated on: Jul 25, 2023 | 3:17 PM

अहमदनगर | 25 जुलै 2023 : प्रत्येकाला आपले लग्न आगळ्यावेगळ्या पद्धतीने व्हावे, असे वाटत असते. काही जणांनी हवेत म्हणजेच विमानात लग्न केले आहे. काही जणांनी पाण्यावर लग्झरी क्रूझवर लग्न लावले आहे. त्यापेक्षा वेगळे लग्न अहमदनगर जिल्ह्यात झाले आहे. त्यामुळे या अनोख्या लग्नाची चर्चा सर्वत्र झाली आहे. हे लग्न स्मशानभूमीत झाले आहे. नगर जिल्ह्यातील राहातामध्ये स्मशानभूमीत सनई चौघड्यांचे स्वर वाजले. मांडव टाकला गेला. गुरुजींच्या आवाजात मंगलाअष्टक झाली. अंधश्रद्धेला फाटा देत या जोडप्याने का केला स्मशानभूमीत विवाह.

का लावले असे लग्न

आपल्याकडे स्मशान शुभ मानले जात नाही. त्यामुळे कोणतेही शुभ कार्य त्या ठिकाणी होत नाही. परंतु गंगाधर गायकवाड यांनी आपल्या मुलीचा विवाह स्मशानत करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी लग्नाच्या सर्व पारंपारिक परंपरा करण्यात आला. धुमधडाक्यात हे लग्न झाले. शिक्षित युवक मनोज जयस्वाल याने गंगाधर गायकवाड याच्या या निर्णयास पाठिंबा दिला.

मयुरी अन् मनोज अडकले विवाह बंधनात

स्मशानभूमीमध्ये प्रत्येकाच्या आयुष्याचा शेवटचा प्रवास असतो. परंतु मयुरी अन् मनोजने या ठिकाणी नवीन आयुष्याची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. मग स्मशानात मयुरी आणि मनोज यांच्या विवाहासाठी स्मशानभूमीतच मांडव टाकला गेला. सनई चौघाड्यांचा सुरात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला. या लग्नाचे कन्यादान माजी नगराध्यक्षा ममता पिपाडा अन् राजेंद्र पिपाडा यांनी केला.

का केले स्मशानभूमीत लग्न

गंगाधर गायकवाड हे गेल्या २० वर्षांपासून स्मशानभूमीत काम करत आहेत. त्यामुळे या ठिकाणी मुलीचे लग्न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. या माध्यमातून स्मशान अशुभ नसते, हा संदेश त्यांना द्यायचा होता.

मैत्रीचं रुपांतर प्रेमात

मयुरी आणि मनोज दोघेही शिर्डीत एकाच ठिकाणी होते. त्या ठिकाणी त्यांची मैत्री झाली. हळूहळू या मैत्रीचे रुपांतर प्रेमामध्ये झाले. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा विचार केला. त्याला घरच्या मंडळींनी परवानगी दिली. अन् थाटामाटात विवाह झाला.

फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब, पण शिरसाटांच्या त्या वक्तव्यान खळबळ
फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब, पण शिरसाटांच्या त्या वक्तव्यान खळबळ.
हार असो वा जीत... महायुतीत टार्गेट 'अजित'? लोकसभेत भाजप अन् विधानसभेला
हार असो वा जीत... महायुतीत टार्गेट 'अजित'? लोकसभेत भाजप अन् विधानसभेला.
मारकडवाडीत फेरमतदान की घमासान रंगणार? EVM वर शंका अन् स्वखर्चानं मतदान
मारकडवाडीत फेरमतदान की घमासान रंगणार? EVM वर शंका अन् स्वखर्चानं मतदान.
शिंदेंना गृहखात्यावरून भाजपचा स्पष्ट संदेश, शिवसेनेचा हट्ट पण भाजप ठाम
शिंदेंना गृहखात्यावरून भाजपचा स्पष्ट संदेश, शिवसेनेचा हट्ट पण भाजप ठाम.
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?.
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?.
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट.
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी.