पुण्यात लसीकरणाचा वेग वाढला, सलग 75 तास लसीकरण, रात्रीही लसीकरण केंद्रे सुरु राहणार

| Updated on: Oct 12, 2021 | 10:50 AM

Pune Covid vaccination | स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरी निमित्त पुणे जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात काही ठिकाणी पुढील सात दिवस सलग 75 तास लसीकरणाची मोहीम राबवण्यात येणार आहे. त्यानुसार सोमवारपासून लसीकरणाला झाला प्रारंभ झाला आहे. या काळात रात्रीच्या वेळीही लसीकरण सुरुच राहील.

पुण्यात लसीकरणाचा वेग वाढला, सलग 75 तास लसीकरण, रात्रीही लसीकरण केंद्रे सुरु राहणार
संग्रहित छायाचित्र.
Follow us on

पुणे: गेल्या महिन्यात इंजेक्शन सिरींजच्या तुटवड्यामुळे मंदावलेल्या पुण्यातील कोरोना लसीकरण मोहिमेला पुन्हा एकदा वेग आला आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण वाढले आहे. ऑक्टोबर महिन्यातील पहिल्या 10 दिवसांमध्येच सहा लाख नागरिकांना लस टोचण्यात आली. पुण्यात आतापर्यंत लसीचा पहिला डोस 88 टक्के , तर दुसरा डोस 49 टक्के जणांना देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरी निमित्त पुणे जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात काही ठिकाणी पुढील सात दिवस सलग 75 तास लसीकरणाची मोहीम राबवण्यात येणार आहे. त्यानुसार सोमवारपासून लसीकरणाला झाला प्रारंभ झाला आहे. या काळात रात्रीच्या वेळीही लसीकरण सुरुच राहील. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी नुकतीच लसीकरण केंद्राला रात्री अचानक भेट देऊन केली पाहणी केली होती. प्रशासनाकडून आठवडाभरात 10 लाख लोकांना लस टोचण्याचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांना महाविद्यालयात लस मिळणार

पुण्यातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयात कोरोना लस देण्याचा निर्णय पालिकेने नुकताच घेतला होता. त्यानुसार 18 वर्षांवरील विद्यार्थ्यांना थेट महाविद्यालय परिसरातच लस उपलब्ध करुन दिली जाईल. लसीकरणाचे दोन्ही डोस झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात येण्याची परवानगी असेल.

पुण्यातील सर्व पर्यटनस्थळं आजपासून खुली

रा्ज्यातील पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे मंगळवारपासून खुली झाली आहेत. त्यामुळे पहिल्याच दिवशी लोणावळ्यात पर्यटकांनी हजेरी लावायला सुरुवात केलीये. कोरोना निर्बंधांमुळं यंदाच्या पावसाळ्यात पर्यटकांचा हिरमोड झाला असला तरी आता बंदी उठल्याने त्यांना गुलाबी थंडीचा आनंद अगदी निर्धास्तपणे लुटता येईल.

देशात नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या 14 हजारांवर

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. गेले काही दिवस नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होताना दिसत होती, मात्र आता पुन्हा एकदा रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत जवळपास 4 हजारांनी घट झाली. कालच्या दिवसात देशात 14 हजार 313 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 181 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यातल्या त्यात दिलासा मानला जात आहे. देशातील सक्रिया कोरोनाग्रस्त रुग्णसंख्या सव्वा दोन लाखांच्या आत आहे.

आतापर्यंतची आकडेवारी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 39 लाख 85 हजार 920 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 33 लाख 20 हजार 57 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 50 हजार 963 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 2 लाख 14 हजार 900 इतके सध्याच्या घडीला सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत.

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 95 कोटी 89 लाख 78 हजार 49 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

संबंधित बातम्या :

कोरोनाची तिसरी लाट ‘या’ महिन्यांत शिखर गाठेल; शास्त्रज्ञांनी वर्तवला अंदाज