AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवार यांच्यावरील टीकेवरुन सुप्रिया सुळे यांनी संजय राऊत यांना सुनावले, मोजक्या शब्दांत म्हणाल्या…

Ajit Pawar and Supriya Sule : सुप्रिया सुळे यांनी संजय राऊत यांना खडेबोल सुनावले आहे. अजितदादांवर केलेल्या टीकेबद्दल मला हसू येते. हे सर्व बाळबोध आहे. आम्ही नेहमी नाती जपली आहेत...

अजित पवार यांच्यावरील टीकेवरुन सुप्रिया सुळे यांनी संजय राऊत यांना सुनावले, मोजक्या शब्दांत म्हणाल्या...
supriya sule ajit pawar
| Updated on: Aug 20, 2023 | 11:48 AM
Share

प्रदीप कापसे, पुणे | 20 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर संजय राऊत यांनी टीका केली आहे. संजय राऊत यांनी रविवारी लिहिल्या रोखठोकमधून अजित पवार यांना लक्ष केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, शरद पवार यांनी अनेक संस्था उभारल्या आहेत. त्यामधील अनेक संस्थांवर अजित पवार आहेत. यामुळे या संस्थांचे पुढे काय करायचे त्यावर चर्चेसाठी शरद पवार आणि अजित पवार यांच्यात बैठक झाली. या संस्थांमधून अजित पवार यांनी बाहेर पडावे, असे संजय राऊत यांनी म्हटले होते. राऊत यांच्या त्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. संजय राऊत यांनी खडेबोल सुनावले आहे.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे

टीव्ही ९ मराठीशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली. त्या म्हणाल्या की, आमचे राजकीय मतभेद आहे. परंतु आमच्यात मनभेद नाही. अजितदादांवर केलेल्या अशा टीकेबद्दल मला हसू येते. हे सर्व बाळबोध आहे. या सर्व संस्थांच्या काय करायचे ते आम्ही ठरवू. आम्ही नाती नेहमी जपली आहेत. घरातील नातीतर सोडा आज देशात अनेक ठिकाणी आमची नाती तयार झाली आहेत. माझ्यावर चव्हाण साहेबांचे संस्कार झाले आहे, पवार कुटुंबियांचे संस्कार आहे. यामुळे आम्ही सर्वांशी प्रेमाने बोलणार आहे, संजय राऊत यांचे वक्तव्य हे बाळबोध असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले.

कांदा निर्यातीवर ते सत्य ठरले

तीन महिन्यांपूर्वी मी पीयूष गोयल यांना ट्विट केले होते. त्या वेळी त्यांना कांदा निर्यातीला परवानगी द्या, अशी मागणी केली होती. परंतु त्याची दखल घेतली गेली नाही. आज कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क लावले आहे. केंद्र सरकारची भूमिका नेहमी शेतकऱ्यांच्या विरोधात राहिली आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

आधी देश, नंतर पक्ष

चीनने भारताची भूमी ताब्यात घेतल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला होता. त्यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाले की, हा विषय संवेदनशील आहे. आम्ही नेहमी ‘नेशन फस्ट’ धोरण अवलंबतो. पहिले देश त्यानंतर पक्ष, यामुळे या विषयावर जाहीर चर्चा नको. केंद्र सरकारने या विषयावर सर्वपक्षीय बैठक घ्यावी, अशी अपेक्षा सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.

त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.