AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाज्यांवर ‘सक्रांत’, किरकोळ बाजारात भाज्यांच्या दरात मोठी वाढ

vegetables rate | यंदा कमी झालेल्या पावसाचे परिणाम जाणवू लागले आहे. पावसामुळे कमी लागवड झाल्यामुळे भाजीपाला महाग होत आहे. पुणे शहरात भोगी आणि संक्रांतीसाठी लागणाऱ्या भाज्यांना मागणीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे किरकोळ बाजारात भाज्यांच्या दरात २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

भाज्यांवर 'सक्रांत', किरकोळ बाजारात भाज्यांच्या दरात मोठी वाढ
vegetables
| Updated on: Jan 15, 2024 | 9:51 AM
Share

योगेश बोरसे, पुणे, दि.15 जानेवारी 2024 | देशात यंदा कमी झालेल्या पावसामुळे खरीप आणि रब्बी हंगामावर परिणाम झाला आहे. यामुळे यंदा रब्बी हंगामाची लागवड कमी झाली आहे. आता मागणी वाढल्यामुळे मकर संक्रांतीमुळे भाज्यांचे भाव कडाडले आहे. पुणे शहरात भोगी आणि संक्रांतीसाठी लागणाऱ्या भाज्यांना मागणीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे किरकोळ बाजारात भाज्यांच्या दरात २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात पावशेर भाजीचे दर ३० ते ४० रुपयांपर्यंत गेला आहे. वाल पापडी, पापडी, मटार, वांगी, पावटा, गाजर, कांदापात, वांगी आदी भाज्यांना मागणी संक्रातीमुळे वाढली आहे. यामुळे सामान्यांना अधिक दर देऊन भाजीपाला खरेदी करावा लागत आहे.

असे आहेत भाज्यांचे दर

  • किरकोळ बाजारात भाज्यांचे दर (किलो)
  • हरभरा गड्डी – २५ ते ३० (एक गड्डी)
  • वालपापडी – १२० ते १४०
  • पापडी – १२० ते १४०
  • वांगी – १२० ते १४०
  • पावटा – १२० ते १४०
  • भुईमूग शेंग – १६० ते २००
  • मटार – ८० ते १००
  • गाजर – ५० ते ६०

मंदिरात 25 प्रकारच्या फळभाज्यांची सजावट

मकर संक्रांत हा नवीन वर्षातील पहिला सण आहे. यामुळे पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात 25 प्रकारच्या फळभाज्या, तिळगुळ आणि विविध फुलांचा वापर करत अनोखी सजावट करण्यात आली आहे. ही सजावट पुणे येथील श्री विठ्ठल भक्त अमोल शेरे यांनी केली आहे.

श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचा गाभारा , सोळखांबी ,चारखांबी अशा मंदिराच्या विविध भागांना गाजर, मुळा, फ्लोवर, कोबी, टोमेटो, मेथी, पालक, शेपू, तांदूळसा, भेंडी, गवार, कारले, वांगे, बटाटा, बिट सोबत अगदी सराटी, घोळ, चिघळ, कुर्डू, केळफूल, कडवंची, हदगाचिंचेचा चिगोरफूल, चंद्र नवखा, देवडांगरं अशा 25 प्रकारच्या भाज्या एकत्रित करून सजवले आहे. तसेच काही ठिकाणी तिळगूळ वापरून ही सजावट अधिकच सुंदर केली आहे. या सजावटीमुळे श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे रुप अधिकच खुलून दिसत आहे.

समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.