AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वारगेट बस बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक, अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले – जरा तारतम्य ठेवा..

स्वारगेट बस स्टँड परिसरात शिवशाही बसमध्ये 26 वर्षाच्या तरूणीवर अत्याचार करणारा नराधम आरोपी दत्तात्रय गाडे याच्या पोलिसांनी काल मध्यरात्री मुसक्या आवळल्या. याप्रकरणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली

स्वारगेट बस बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक, अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले - जरा तारतम्य ठेवा..
अजित पवारImage Credit source: TV9
| Updated on: Feb 28, 2025 | 11:29 AM
Share

स्वारगेट बस स्टँड परिसरात शिवशाही बसमध्ये 26 वर्षाच्या तरूणीवर अत्याचार करणारा नराधम आरोपी दत्तात्रय गाडे याच्या पोलिसांनी काल मध्यरात्री मुसक्या आवळल्या. तब्बल 70 तासांच्या शोधमोहिमेनंतर पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने गुनाट गावातून आरोपीला बेड्या ठोकल्या. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. याप्रकरणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काल पुण्याच्या घटनेची सर्वांनी निषेध केला. नराधमाला अटक झाली पाहिजे म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो. त्याला रात्री 1 वाजता अटक केली. पोलिसांच्या ताब्यात आहे. चौकशी सुरू आहे. आज कोर्टात त्याला हजर केलं जाणार आहे. त्यातून काय वस्तुस्थिती आहे. हे निष्पन्न होईल, असे अजित पवार म्हणाले.

मी सकाळी सीपींशा बोललो. आरोपीला काल रात्री 1 वाजता ताब्यात घेतलं. चौकशी सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. पण चौकशी सुरू असताना आरोपी हा इकडे गेला, तिकडे गेला असं मीडियावाले चालवतात. जी विकृत व्यक्ती असते तिला पकडण्यासाठी वेगळ्या बातम्या दिल्या तर अमूक राज्यात अमूक व्यक्ती गेली, राज्यात गेली, जिल्ह्यात गेली असं सांगितलं जातं मात्र अशा बातम्या देताना तारतम्य बाळगलं पाहिजे. अन्यथा त्या माहितीचा विकृत आरोपी फायदा घेऊ शकतात, असे म्हणत अजित पवारांनी मीडियालही फटकारलं. तसेच आम्हीही राजकीय लोकांनी तारतम्य ठेवलं पाहिजे. दोषीला पकडण्यासाठी बातम्यांचा उपयोगझाला पाहिजे, त्याला स्वतला लपवण्यासाठी होता कामा नये असंही अजित पवारांनी सुनावलं.

संजय राऊतांना टोला

माध्यमांशी संवाद साधत असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पोलिसांवर आणि सरकारवर निशाणा साधला होता, आरोपीला पकडलं म्हणजे उपकार केले का ? पुण्यात ही घटना घडते, गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरला नाही असा आरोप राऊत यांनी केला होता. त्यावर अजित पवारांनी उत्तर दिलं. एक व्यक्ती रोज सकाळी बोलत असते. आम्ही त्यावर बोलायला बांधिल नाही, असे म्हणत अजित पवार यांनी राऊतांना टोला लगावला.

Follow Us
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्..
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्...हादरवून टाकणारं प्रकरण समोर!
अखेर बावनकुळेंचा मनोज जरांगेंच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, 'माझं...
अखेर बावनकुळेंचा मनोज जरांगेंच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, “माझं रक्तच तसं नाही जे कोणी...
Third Mumbai | तिसऱ्या मुंबईच्या विकासाला वेग; 1.1 कोटींची गुंतवणूक
Third Mumbai | तिसऱ्या मुंबईच्या विकासाला वेग; सिंगापूर करणार 1.1 कोटींची गुंतवणूक अन्...
तुकाराम मुंढेंचं ‘कॉक्रोच’बाबत विधान अन् सभागृहात टाळ्यांचा कडकडाट,
तुकाराम मुंढेंचं ‘कॉक्रोच’बाबत विधान अन् सभागृहात टाळ्यांचा कडकडाट, पहा नेमकं काय काय म्हणाले?
राज ठाकरेंचा आरोप अन् फडणवीस सरकार ॲक्शन मोडमध्ये! सिद्धिविनायक...
मोठी बातमी! राज ठाकरेंचा आरोप अन् फडणवीस सरकार ॲक्शन मोडमध्ये! सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी घोटाळ्याची चौकशी होणार
गुणरत्न सदावर्तेंचं गाणं चर्चेत; जरांगे पाटलांसह शिंदे-सामंतांना....
Gunratna Sadavarte | पळा, पळा, पळा अरे...जरांगेंचा काळ...गुणरत्न सदावर्तेंचं गाणं चर्चेत; जरांगे पाटलांसह शिंदे-सामंतांना गाण्यातून डिवचलं
नाशिक सिंहस्थ कुंभमेळा कारभारावर साधू-महंत नाराज? अचानक... कारण काय?
नाशिक सिंहस्थ कुंभमेळा कारभारावर साधू-महंत नाराज? अचानक... नेमकं काय घडलं?
FCRA बिलावर सुप्रिया सुळे आक्रमक; आमच्यावर लादू नका, आधी चर्चा करा!
FCRA बिलावर सुप्रिया सुळे आक्रमक; आमच्यावर लादू नका, आधी चर्चा करा! सरकारला थेट आवाहन
मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मराठ्यांच्या नोंदी रद्द...
Manoj Jarange Patil | मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मराठ्यांच्या नोंदी रद्द का करता? सरकारला थेट सवाल
शासकीय खुर्चीवर महिला उपध्यक्षांच्या जागेवर पती बसला अन्...
शासकीय खुर्चीवर महिला उपध्यक्षांच्या जागेवर पती बसला अन्...  चक्क धनंजय मुंडेंसमोर हे काय घडलं?