Devendra Fadnavis: मराठा समाजासाठी कोणता मास्टर प्लॅन? सारथी कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितले काय?
Devendra Fadnavis On Sarthi : जगाच्या पाठीवर मराठा समाजा इतके शिस्तबद्ध आणि शांततापूर्ण मोर्चे निघाले नाही. ही एक अभिनव प्रयोग असल्याचे सांगत त्यानंतर राज्य सरकारने मराठा समाजासाठी काय काय उपाय योजना केल्या याची जंत्रीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाचून दाखवली. त्यांनी काय दिली माहिती?

Devendra Fadnavis On Sarthi: शिस्तबद्ध आणि शांततापूर्ण मराठा मोर्चेचे कौतुक करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजासाठी राज्य सरकारने काय काय उपाय योजना केल्या याची जंत्रीच वाचून दाखवली. विविध योजना आणि सारथीच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांमध्ये मराठा समाजाचा टक्का वाढला, पावणे दोन लाख उद्योजक तयार झाली अशी माहिती आज पुण्यातील कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी दिली. मराठा समाजासाठी अजून काय काय योजना राबविण्यात येत आहे, त्याची माहिती त्यांनी दिली.
मराठा समाजासाठी योजना काय?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सरकारच्या कळात काय काय उपाय योजना करण्यात आल्या. त्याची माहिती दिली. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजना आणि विद्यार्थ्यांना घरामध्ये राहण्याकरता त्यांच्या जेवणाचा खर्च आणि त्यांच्या पुस्तकांचा खर्च हा देण्याकरता योजना 8000 रुपयांपर्यंत त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना तो खर्च दे खर्च देखील मिळाला पाहिजे आणि त्यातलं चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना अशा प्रकारचा प्रयत्न आपण सुरू केला. रोजगाराच्या दृष्टीने पाटील आर्थिक विकास महामंडळ महामंडळ आपण त्या ठिकाणी पुनरुज्जीवित केले. नरेंद्र पाटील जे अण्णासाहेब पाटील यांनी पहिल्यांदा मराठा आरक्षणाचा बलिदान केलं त्यांचे पूत्र नरेंद्र पाटलांना महामंडळाचे अध्यक्ष केलं आणि मोठ्या प्रमाणात आपण त्याच्यामध्ये व्याज सवलतीची योजना आणली. मला सांगताना आनंद वाटतो जवळपास पावणेदोन लाखापेक्षा जास्त उद्योजक हे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने तयार केले.
साडेसात हजार कोटी रुपयांचे कर्ज वाटप
यापूर्वीचा अनुभव असा होता दुर्दैवाने त्याच्यावर वापरायचे नाही औपचारिकता अशा पद्धतीची महामंडळ होती. महामंडळाला कर्ज देण्याचा अधिकार तर देऊ त्या ठिकाणी प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करावा लागतो. सर्वे करावा लागतो त्याकरता तुमच्याकडे व्यवस्था आहे की नाही ते दाखवावी लागते. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळात भरून बिनव्याजी कर्ज हे उपलब्ध करून द्यायचं आणि त्यातला उद्योजक तयार करायचे आणि मला आनंद आहे पाटलांनी गावोगावी दौरा केला आणि प्रत्येक ठिकाणी बँकांची आम्ही बैठका घ्यायचो बँकांना टार्गेट द्यायचो आणि आज या ठिकाणी व्याजापोटी 1500 कोटी रुपये आपण भरतो आणि जवळपास साडेसात हजार कोटी रुपयांचा कर्ज हे आपण अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून दिले, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
सारथीने स्पर्धा परीक्षामधील टक्का वाढला
एक गोष्ट अजून आमच्या लक्षात आली त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षांमध्ये प्रशिक्षणामध्ये कौशल्य प्रशिक्षणामध्ये मराठा समाजाचा टक्का वाढवायचा असेल तर त्याकरता आपण ज्यावेळेस बार्टीची सुरुवात ही आपल्या अशी एक संस्था उभी केली पाहिजे की जी संस्था प्रशिक्षण देईल. जी संस्था त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचा अभ्यासक्रमाकरीता तुमची तयारी पण करून घेईल वेगवेगळ्या प्रकारे कौशल्य देखील आपल्याला देईल. त्याकरता आपण सदानंद मोरे यांची कमिटी तयार केली. चंद्रकांत दादाच त्याचे अध्यक्ष होते. समितीच्या माध्यमातून आपण 2018 साली सारथी ची स्थापना करत असताना आपल्या मनामध्ये त्यावेळी हीच भावना होती की आपणास स्पर्धा परीक्षांमध्ये हा समाजाचा टक्का वाढला पाहिजे. पूर्वी एखादा विद्यार्थी हा यूपीएससीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसत होता आज दरवर्षी सारखी मुळे पीएचडी करत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण निंबाळकर साहेब आणि त्यांच्या टीमचं त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम हे साथीच्या माध्यमातून सुरू केले आणि आज केवळ स्पर्धा परीक्षा पुरता मर्यादित नाही स्पर्धा परीक्षा तर महत्त्वाचे आहेतच, पण बँकिंग एक्झाम मध्ये आणि इतर ठिकाणी विद्यार्थी चमकत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
एआयसह नवीन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण
कम्प्युटर असेल एआय असेल या प्रत्येक गोष्टीमध्ये आता वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी ज्या काही आपल्या तरुणांना कसं निपुण करता येईल शेतीच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र सरकारने शेतकरी आपल्या भाषेमध्ये मराठीत हिंदीत अगदी आमचा आदिवासी शेतकरी फिल्म भाषेमध्ये त्या ॲपवर अरे कुठलाही प्रश्न त्यांनी विचारला पीक पद्धतीच्या बाबतीत क्रॉपिंग त्याच्यावर किडीच्या बाबतीत कीड व्यवस्थापनाच्या बाबतीत काय मी वापरला पाहिजे इतकच नाही फोटो काढला पिकाचा परिस्थिती काय आहे असले तर काय वापरले पाहिजे अशा पद्धतीने शेतीमध्ये मला सांगताना आनंद वाटतो की जवळपास 50 लाख शेतकरी आता या विस्तार ॲप वर ऑन बोर्ड झाले शेती क्षेत्रामध्ये मेकॅनिझम करण्याची प्रशिक्षण देण्याची आणि आमच्या सारखी संस्थेने सगळ्यात महत्त्वाचं काम काय चालू केलं असेल शेतीचे क्षेत्र हे मिळत नाहीत परवडत नाही शेती क्षेत्रामध्ये द्रोण पायलट गावोगावी आपण हे तयार केले तर या रोड पायलटच्या माध्यमातनं शेतीमधल्या अनेक गोष्टी सर्व प्रकारचे फवारणी असेल. शेती वातावरणाच्या बदलाचा काय त्याच्यावर परिणाम होणार आहे हा तरुण त्याचा वापर करून आणि शेतकऱ्यांना देऊ शकेल अशा प्रकारचे कोर्सेस देखील आणि आता या ठिकाणी सुरू झालेले आहेत. आपला महाराष्ट्र एक प्रकारे देशाचा मॅन्युफॅक्चर आणि म्हणून देशाच्या मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आज सर्वात जास्त कौशल्य प्रशिक्षित अशा प्रकारचे मानव संसाधनाची आवश्यकता आपल्याला त्यासंदर्भात देखील काम आता आपल्या ते सारथीच्या माध्यमातून सुरू झाल आहे. सर्व प्रकारचं प्रशिक्षण समाजातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत सर्व प्रकारच्या संधी या पोचवण्याचं काम आपण करतोय. मला या गोष्टीचा आनंद आहे की अण्णासाहेब पाटील महामंडळाची अमरावती असेल नागपूर असेल लातूर असेल कोल्हापूर असेल विभागीय मुख्यालय होत आहे तिथे हॉस्टेल्स होत आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.