AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गेल्या वर्षीच्या तुलनेत वाशी मार्केटमध्ये हापूस आंब्याची आवक वाढली, काय आहेत दर

गेल्या वर्षीच्या तुलनेत वाशी मार्केटमध्ये आंब्याची आवक वाढली आहे. 40 ते 45 हजार आंब्याच्या पेट्यांची वाशी मार्केटमध्ये आवक झाली आहे. तसेच रमजान सुरु झाल्यामुळे अखाती देशात हापूस भाव खात आहे. युरोपलाही हापूस आंब्यांनी भुरळ घातली आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत वाशी मार्केटमध्ये हापूस आंब्याची आवक वाढली, काय आहेत दर
हापूस आंबे
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Mar 26, 2023 | 12:19 PM
Share

पुणे, रत्नागिरी : कोकणातील रत्नागिरी अन् देवगड हापूस देशात नाही तर विदेशातही प्रसिद्ध आहे. यामुळे युरोपातील बाजारातही त्याला चांगला भाव मिळत आहे. भारतीय चाहत्यांबरोबर विदेशातील खवय्यांच्या पसंतीला हापूस उतरत आहे. कोकणातील 40 टक्के आंबा युरोप आणि आखाती देशांमध्ये निर्यात होतो. आता रमजान महिना सुरू झाल्यामुळे आखाती देशात हापूसच्या मागणीत आणखी वाढत आहे. दुसरीकडे गेल्या वर्षीच्या तुलनेत वाशी मार्केटमध्ये आंब्याची आवक वाढली आहे. 40 ते 45 हजार आंब्याच्या पेट्यांची वाशी मार्केटमध्ये आवक झाली आहे. यामुळे आता दर आवाक्यात आले आहे.

वाशीमध्ये दर किती

वाशीच्या बाजारात मोठ्या प्रमाणात हापूस आंबा आला आहे. यामुळे मार्चच्या सुरवातीला वाढलेले दर आता घसरु लागले आहे. आब्यांच्या साईज व क्वॉलेटीनुसार दर आहे. आता हापूस आंब्याला पंधराशे ते साडेचार हजार दर मिळत आहे. गेल्याच वर्षी वाशी मार्केटमध्ये वीस ते पंचवीस हजार आंब्याच्या पेट्यांची आवक झाली होती. त्यावेळी दर दोन ते पाच हजारापर्यंत होता. दर आवाक्यात आल्यानंतर अनेक मुंबईकरांनी वाशी मार्केटमध्ये हजेरी लावली आहे. यामुळे हापूस खरेदीसाठी गर्दी झाली आहे.

आवक चांगली

गेल्या आठवडाभरात कोकण पट्ट्यात झालेल्या पावसामुळे मार्केट यार्डात हापूस आंब्याची आवक झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे मार्केट यार्डात हापूस आंब्याच्या साठ्याची चांगली आवक होत आहे. रत्नागिरी आणि देवगड हापूस आंब्याचे दर फळांच्या आकारानुसार चार ते सहा डझन पेट्यांसाठी ठरवले जात आहेत. परंतु हे दर सरासरी एक हजार रुपये डझनवर जात आहे.

कोकणातून कुठे निर्यात

कोकणातून सौदी अरेबिया, नेदरलँड, युरोपीय देश, अरब देश, कुवेत, अमेरिका, जर्मनी व चीनमध्ये हापूस आब्यांला खूप मागणी आहे. तसेच आब्यांबरोबर कोकणातून 10 हजार मेट्रिक टन पल्पची निर्यात होते. त्यातून 90 कोटी 39 लाख परकीय चलन अपेक्षित आहे. आंबा आमि पल्प निर्यातून सुमारे 340 कोटी रुपये परकीय चलन मिळते. समुद्रमार्गे आब्यांची निर्यात होणार असेल तर त्याचा थेट फायदा स्थानिक शेतकर्‍यांना होणार आहे. त्याद्दष्टिने हालचाली करणे गरजेचे आहे.

गुढी पाडव्यासाठी आंबे खरेदीला जाताय, आधी दर पाहून जा…वाचा सविस्तर

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?