घटस्फोटासाठी डॉक्टरने पत्नीच्या शरीरात HIV इंजेक्शन सोडलं

घटस्फोटासाठी डॉक्टरने पत्नीच्या शरीरात HIV इंजेक्शन सोडलं

पिंपरी चिंचवड : आधी हुंड्यासाठी नकार दिल्याने आणि मग घटस्फोटासाठी एका महिलेच्या शरीरात एचआयव्हीचे विषाणू सोडल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. पीडित महिलेने डॉक्टर असणाऱ्या पतीवर तसे आरोप केले आहेत. याप्रकरणी वाकड पोलिसांनी पतीसह सासू-सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केलाय.

पोलीस पीडित महिलेचा वैद्यकीय अहवाल स्वतः रुग्णालयात जाऊन तपासणार आहेत. त्यानंतरच अटकेची कारवाई केली जाईल. 20 मे 2015 ला पीडित महिलेचा डॉक्टर असलेल्या तरुणाशी विवाह झाला. तेव्हापासून फेब्रुवारी 2018 दरम्यान हुंड्यासाठी तिचा छळ सुरू असल्याचा आरोप आहे.

काही रक्कम माहेरहून पीडितीने आणून दिल्याचंही म्हटलंय. मात्र त्यांची अपेक्षा वाढल्याने मग पीडितीने नकार दिला. तिथून घटस्फोटासाठी ससेमिरा सुरू झाला. त्यानंतर आजारी असताना डॉक्टर पतीने रक्तातून एचआयव्हीचे विषाणू शरीरात सोडल्याचा आरोप पीडित महिलेने केलाय. तसे रिपोर्ट पोलिसांकडे तिने दिलेले असले तरी पोलीस स्वतः पीडितेला रुग्णालयात नेऊन समक्ष वैद्यकीय अहवाल तयार करणार आहेत. त्यानंतर अटकेची कारवाई होईल.

पतीने सर्व आरोप फेटाळताना पत्नी आणि तिचे कुटुंबीय सुरुवातीपासून फसवणूक करत असल्याचं म्हटलंय.

पीडित महिलेचा पती ग्लोबल हॉस्पिटलमध्ये कामाला आहे. तिथेच गेल्या नोव्हेंबरमध्ये त्याने पत्नीला उपचारासाठी दाखल केलं होतं. मानेवर उठलेली गाठ टीबीची असेल असं गृहीत धरून पत्नीच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले, पण रिपोर्ट एचआयव्ही बाधितचा आल्याचं डॉक्टर सांगतात.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI