AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोण? निवडणूक आयोगाचं समन्स; शरद पवार यांची रोखठोक प्रतिक्रिया काय?

शरद पवार यांना वाघ नखांच्या वादावर विचारण्यात आलं. त्यावर, मला काही त्यातील ज्ञान नाही. मी इंद्रजित सावंत हे इतिहासाचे जाणकार आहेत. त्यांचं वेगळं मत ऐकलं. प्रत्यक्ष काही माहीत नाही. पण या गोष्टीचा वाद करावा असं वाटत नाही, असं शरद पवार म्हणाले.

राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोण? निवडणूक आयोगाचं समन्स; शरद पवार यांची रोखठोक प्रतिक्रिया काय?
Sharad PawarImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 01, 2023 | 3:59 PM
Share

सुनील थिगळे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, जुन्नर | 1 ऑक्टोबर 2023 : शरद पवार हेच आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, असं अजितदादा गटाचे नेते वारंवार सांगत होते. मात्र, काल अजितदादा गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवार हेच आमचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अजितदादा गट संपूर्ण पक्षावरचा दावा सोडण्यास तयार नसल्याचं यातून स्पष्टही झालं आहे. तर, राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोण? असा सवाल पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या प्रश्नाचं थेट उत्तर दिलं आहे.

अजित पवार हे आज जुन्नर दौऱ्यावर होते. यावेळी प्रफुल्ल पटेल यांच्या विधानाकडे त्यांचं लक्ष वेधण्यात आलं. त्यावर त्यांनी थेट उत्तर दिलं आहे. मी महाराष्ट्रात फिरतोय. सर्वसामान्य लोकांच्या स्वच्छ कल्पना आहेत. सामान्य माणूस काय विचार करतोय हे महत्त्वाचं आहे. काल किल्लारीत होतो. 20 हजार लोक जमले होते. त्यांची भाषण ऐकल्यावर वेगळं चित्र दिसतं. हे चित्र महाराष्ट्रात आहे. वेगळी भूमिका कोणी घेतली असेल तर लोकशाहीत त्यांचा तो अधिकार आहे. त्यावर मी भाष्य करणार नाही. पण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रा बाहेरही राष्ट्रवादीचा संस्थापक कोण आहे हे साधारण लोकांना माहीत आहे, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

खड्डे तरी बुजतील

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येत आहे. महिन्यातून दुसऱ्यांदा ते पुण्यात येत आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. पंतप्रधान येत असतील तर चांगली गोष्ट आहे. देशाचे पंतप्रधान आल्यावर निदान रस्त्यावरी खड्डे बुजले जातील. त्यामुळे त्यांचं स्वागत करतो, असा चिमटा त्यांनी लगावला. पंतप्रधानांच्या कार्यक्रमाचं मला माहीत नाही. निमंत्रण दिलंही असेल. सरकारी कार्यक्रम असेल तर आमदार आणि खासदारांना बोलावतात. पण मला काही निमंत्रणाचं माहीत नाही, असं पवार म्हणाले.

एकत्र जेवलो

आमदार अतुल बेनके हे अजितदादा गटाचे आहेत. मात्र, ते आज शरद पवार यांच्यासोबत दिसले. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्याबाबत शरद पवार यांना विचारण्यात आलं. त्यावर, अतुल बेनके माझ्या गाडीत नव्हते. पण आम्ही एकत्र जेवण केलं, असं पवार यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

भाजपसोबत जाणार नाही

मी आता पर्यंत किती चिन्हावर लढलो त्यामुळे चिन्ह महतावाचे नाही तर लोकांचे विचार आणि चेहरा महत्वाचा असतो, असं सांगतानाच जे लोक भाजपसोबत आहेत. ते राष्ट्रवादीचे असू शकत नाही. जे लोक भाजपसोबत गेले असतील तो विचार आम्ही स्वीकारणार नाही. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आम्हाला लोकांनी भाजप विरोधात मतदान केलं आहे. त्यामुळे आम्ही भाजपसोबत जाणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

आयोगाचं समन्स आलंय

निवडणूक आयोगाने मला समन्स दिलं आहे. येत्या 6 तारखेला मला बोलावलं आहे. मी जाणार आहे. माझे वकीलही सोबत असतील. त्यावेळी आम्ही आमची भूमिका मांडू, असंही त्यांनी सांगितलं.

Follow Us
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे...
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे महाराष्ट्राचे लक्ष!
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत