Pune crime|भाडेतत्वार महिंद्रा XUV कार घेऊन पळाले ; पोलिसांनी आवळल्या मुसक्या

| Updated on: Feb 02, 2022 | 7:14 PM

पुण्यातून प्रवासासाठी भाडेतत्वावर घेतलेलया महिंद्रा XUV कार घेऊन पळून गेलेल्या  दोघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. बंडगार्ड तपास पथकातील पोलीसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून तपास करून गोव्यामधून दोन आरोपींना अपहार केलेल्या कारसह अटक केली आहे.

Pune crime|भाडेतत्वार महिंद्रा XUV कार घेऊन पळाले ; पोलिसांनी आवळल्या मुसक्या
CRIME
Follow us on

पुणे – शहरात दररोज नवनवीन गुन्ह्याच्या घटना समोर येत आहेत. पुण्यातून (Pune )प्रवासासाठी भाडेतत्वावर घेतलेलया महिंद्रा XUV कार घेऊन पळून गेलेल्या  दोघांच्या पोलिसांनी (Police) मुसक्या आवळल्या आहेत. बंडगार्ड तपास पथकातील पोलीसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून तपास करून गोव्यामधून (Goa) दोन आरोपींना अपहार केलेल्या कारसह अटक केली आहे. हमीद बावर ऊर्फ छेदी खान (वय 40, रा.कोडलीम, अंगडी, गोवा), व अविनाशकुमार प्रेमचंद यादव (वय 32, रा.कोलया गोवा) अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत मच्छिंद्र विश्वनाथ दराडे (लोकमान्य कॉलनी, कोथरुड पुणे) यांनी बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती.

सोने चोरी प्रकरणी चौघांना अटक
दुसरीकडे धानोरी येथील ज्वेलर्सच्या घरातून चोरी करणाऱ्या चौघांसह अंदाजे 85 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. आरोपींना विश्रांतवाडी पोलिसांनी शिताफीने अटक केली. याप्रकरणी मुकेश गोमाराम चौधरी (वय 22), रमेश रामलाल चौधरी (वय 27), भगाराम गोमाराम चौधरी (वय 38), जेठाराम कृष्णाजी चौधरी (वय 38, सर्वजण रा. खुडाला-बाली, पाली, राजस्थान) सर्वांना अटक करण्यात आली आहे. या सोने चोरीच्या गंभीर गुन्ह्यात एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. चोरी केलेल्या दागिन्यांपैकी सुमारे 56 लाख रुपये किमतीचे एक किलो 406 ग्राम सोन्याचे दागिने विश्रांतवाडी पोलिसांनी तपासात आरोपींकडून हस्तगत केले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय चांदखेडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, धानोरी भैरवनगर येथील सोनाराच्या घरातून 10 जानेवारी रोजी सुमारे 85 लाख रुपये किमतीचे दोन किलो 81 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरी केल्याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

काँमेडीयन सुनील ग्रोव्हरच्या हृदयाची शस्त्रक्रिया, चाहत्यांमध्ये चिंता; प्रकृती स्थिर असल्याची माहिती

Caves of Junnar|जुन्नर तालुक्यातील लेण्यांची परदेशी पाहुण्यांना भुरळ; लेण्यांत ध्यान साधनेचा घेतला अनुभव

कोविशील्ड लसीच्या दुष्परिणामांमुळे मुलीचा मृत्यू, एक हजार कोटी भरपाई द्या, औरंगाबादच्या वडिलांची मुंबई हायकोर्टात याचिका!