Pune | या कारणामुळं उपमुख्यमंत्र्याच्या बंगल्यावर जाऊन सामूहिक आत्मदहन करण्याचा तमाशा कलावंतांचा इशारा

Pune | या कारणामुळं उपमुख्यमंत्र्याच्या बंगल्यावर जाऊन सामूहिक आत्मदहन करण्याचा तमाशा कलावंतांचा इशारा
raghuvir khedkar

तमाशा सादर करण्याची परवानगी न दिल्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंगल्यावर जाऊन सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा अखिल भारतीय मराठी तमाशा परिषद अध्यक्ष रघुवीर खेडकर यांनी दिलाय. ते नारायणगाव येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. देशभर सर्व काही सुरू आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: प्राजक्ता ढेकळे

Jan 22, 2022 | 5:21 PM

पुणे – कोरोनाच्या वाढत्या रुग् संख्येचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्याबरोबरच उद्योजक , व्यावसायिक, लोककलावंत यांच्यावरही झाला आहे. तमाशा कलावंतांवरही कोरोनामुळे उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनाचे निर्बंध शिथिल केल्यानंतर तमाशा कलावंत यांनीही तमाशाचे फड सुरु करून देण्याची मागणी केली आहे.

सर्व सुरु तमाशा मात्रबंद येत्या दोन फेब्रुवारीपर्यंत लोक कलावंतांना तमाशा सादर करण्याची परवानगी न दिल्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंगल्यावर जाऊन सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा अखिल भारतीय मराठी तमाशा परिषद अध्यक्ष रघुवीर खेडकर यांनी दिलाय. ते नारायणगाव येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. देशभर सर्व काही सुरू आहे. मात्र, तमाशा बंद आहे अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली आहे. या प्रशासनाने आम्हाला सावत्र वागणूक दिल्याच त्यांनी म्हटलं आहे.

प्रशासनाकडुन दुजाभाव रघुवीर खेडकर म्हणाले की, “गेल्या दोन वर्षांपासून लोककलावंत हा तमाशा पासून दूरावला आहे. सध्या करोना आटोक्यात आहे. नाटक, चित्रपटगृहांना 50 टक्के मुभा देऊन ते सुरू होऊ शकतं तर तमाशा का नाही, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, शरद पवार यांच्यासह इतर नेत्यांकडे जाऊन आलो. मात्र, त्यांनी याची दखल घेतली नाही. महाराष्ट्र सरकार हे आमचे मायबाप आहेत. त्यांना सोडून कोणाकडे जायचं? चीन की पाकिस्तान!, त्यामुळं त्यांनी यावर लवकर तोडगा काढावा,” अशी मागणी त्यांनी केली आहे.

Goa Assembly Election 2022 : गोव्यात काँग्रेस उमेदवारांनी घेतली शपथ, भाजपचं टेन्शन वाढलं

Yawatmal Gas Kit | कळंबमध्ये निर्माण झालेल्या सारथीला जर्मनीचे पेटंट, शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा

विद्युत शक्तीवर अर्थव्यवस्थेची भरारी ! वीज वापराची गती काय सांगते? इलेक्ट्रिक वाहनांची देशभरात लवकरच दावेदारी!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें