AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विद्युत शक्तीवर अर्थव्यवस्थेची भरारी ! वीज वापराची गती काय सांगते? इलेक्ट्रिक वाहनांची देशभरात लवकरच दावेदारी!

वीज वापर वाढतो तेव्हा काय होते? सामान्य माणूस आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतो. तर अर्थव्यवस्थेची गती चांगली असते, हे त्याचे द्योतक आहे. खेड्यापाड्यात वीज पोहचल्याचा हा शुभ संदेश आहे. औद्योगिक वसाहतीतील कारखाने आणि कंपन्यांमधील यंत्रांनी मरगळ झटकून पुन्हा उत्पादनाला सुरुवात केल्याचे प्रतिक आहे. भविष्यात येऊ घातलेल्या इलेक्ट्रिक वाहनांची देशभरात लवकरच दावेदारीचा हा पुरावा आहे. 

विद्युत शक्तीवर अर्थव्यवस्थेची भरारी ! वीज वापराची गती काय सांगते? इलेक्ट्रिक वाहनांची देशभरात लवकरच दावेदारी!
| Edited By: | Updated on: Jan 22, 2022 | 4:54 PM
Share

शॉक बसण्यासारखंच आहे राव हे. वीजेच्या जादा वापराचा अर्थव्यवस्थेशी काय संबंध असू शकतो? तुम्ही म्हणाल उगाच काहीही बाता मारु नका. पण मंडळी थांबा. अर्थव्यवस्थेला कायम अंडरकरंट बसत असतात, अर्थात काही करंट बुस्टर ठरतात. देशाची प्रगती जोखतात. अर्थव्यवस्था गतिमान आहे की नाही यासाठी वीज आणि त्याचे परिणाम  सुध्दा परिमापक (parameters)ठरतात.

त्यामुळे जेव्हा वीज वापर वाढतो तेव्हा काय होते? सामान्य माणूस आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतो. तर अर्थव्यवस्थेची गती चांगली असते, हे त्याचे द्योतक आहे. खेड्यापाड्यात वीज पोहचल्याचा हा शुभ संदेश आहे. औद्योगिक वसाहतीतील कारखाने आणि कंपन्यांमधील यंत्रांनी मरगळ झटकून पुन्हा उत्पादनाला सुरुवात केल्याचे प्रतिक आहे. भविष्यात येऊ घातलेल्या इलेक्ट्रिक वाहनांची देशभरात लवकरच दावेदारीचा हा पुरावा आहे. त्यामुळेच जागतिक पातळीवरील आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीने तिच्या अहवालात, 2022-2024 या दरम्यान  देशातील वीज वापर वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. परिणामी अर्थव्यवस्थेची गती चांगली असू शकते, हे त्याचे द्योतक आहे.

पुढील दोन वर्षात नेत्रदीपक वाढ

पुढील दोन वर्षांत म्हणजे 2022 ते 2024 या काळात देशात वीज वापरात नेत्रदीपक वाढ होऊ शकते. आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सी  (International Energy Agency) च्या अहवालात हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अर्थव्यवस्थेची गती चांगली असू शकते, हे त्याचे द्योतक आहे. आयईएचा अंदाज आहे की, 2022-24 दरम्यान भारतात विजेच्या मागणीत सुमारे 6.5 टक्के वाढ होऊ शकते. कोरोना काळात असणाऱ्या वीजेच्या मागणी पेक्षा सध्याची मागणी जास्त आहे. गेल्या पाच वर्षांत विजेच्या मागणीत 3 ते 6 टक्क्यांदरम्यान वाढ झाली आहे.

देशांतर्गत आणि औद्योगिक क्षेत्राच्या वापरात वाढ झाल्यामुळे विजेची मागणी अधिक असेल, असे आयईएचे म्हणणे आहे. 2021 मध्ये कोरोना महामारीच्या काळात भारताची विजेची मागणी 10 टक्क्यांनी वाढली आहे. वीज वापराबाबत भारताने चीनशी बरोबरी केली आहे.

2021 च्या चौथ्या तिमाहीच्या सुरुवातीस ऑक्टोबरमध्ये कोळशाच्या तात्पुरत्या कमतरतेचा परिणाम वीज निर्मिती वर दिसून आला.  अहवालानुसार एप्रिल आणि मे 201 मध्ये कोरोना लाटेमुळे विजेची मागणी 7 टक्क्यांनी कमी झाली होती.

पण जूनमध्ये परिस्थिती पूर्वपदावर आली आणि विजेचा वापर पुन्हा वाढला. जुलै आणि ऑगस्टमध्ये वीज वापरात देशाने नवीन विक्रम प्रस्थापित केला. कोळशाच्या कमतरतेचा  फारसा परिणाम झाला नाही आणि वीज वापराची वार्षिक वाढ सुमारे 10 टक्के राहिली.

मेक इन इंडियावर भर दिल्यास स्थानिक उत्पादनाला आणखी चालना मिळेल आणि उद्योग क्षेत्रात वीज वापर वाढेल. याशिवाय देशातील इलेक्ट्रिक वाहनांवरही भर दिला जात आहे. यामुळे विजेची मागणी वाढण्यासही आणखी हातभार लागेल.

इतर बातम्या-

Pune crime |धक्कादायक ! पुण्यातन गुंडांच्या टोळक्याकडून अल्पवयीन मुलावर गोळीबार

Ahmednagar Crime : अहमदनगरमध्ये जुन्या वादातून तरुणावर गोळीबार, किरकोळ जखमी

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.