Sindhutai sakpal | अनाथांच मायेरूपी धगधगत वादळं अखेर शांत झाल; सिंधुताई सपकाळ यांना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप

| Updated on: Jan 05, 2022 | 1:47 PM

पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सिंधूताई सकपाळ यांच्यावर नवी पेठेतील ठोसरपागा येथील स्मशानभूमीत महानुभव पंथाच्या प्रथेप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

Sindhutai sakpal | अनाथांच मायेरूपी धगधगत वादळं अखेर शांत झाल;  सिंधुताई सपकाळ यांना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
sindhutai sakapal
Follow us on

पुणे- पाण्यानं डबडबलेलं डोळे, जोडलेले हात अन पार्थिवाच्या पुढं नतमस्तक होत, हजारोंच्या उपस्थितीत जेष्ठ सामाजिक सेविका सिंधूताई संकपाळ यांना शासकीय इतमामात मानवंदना देत अखेरचा निरोप देण्यात आला. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सिंधूताई सकपाळ यांच्यावर नवी पेठेतील ठोसरपागा येथील स्मशानभूमीत महानुभव पंथाच्या प्रथेप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. यावेळी शहरातील महापौर मुरलीधर मोहळ , काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांच्यासह अनेक नेते, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकानी सिंधूताई सकपाळ यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

माईंच्या निधनानंतर मांजरी येथील सन्मती बाल निकेतन या आश्रमात दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. माईंच्या निधनाची माहिती मिळात , आश्रमासमोर मोठ्या प्रमाणात अंत्यदर्शनासाठी गर्दी निर्माण झाली होते. सिंधुताईंच्या जाण्याने समाजिका जीवनात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना सर्वच स्तरातून व्यक्त केलं जात आहे.

हृदयविकाराच्या झटक्यानं निधन

पुण्यातील गॅलक्सी रुग्णालयात (Galaxy Hospital) त्यांच्यावर मागील काही दिवसांपासून उपचार सुरु होते. सिंधुताई यांच्यावर महिनाभरापूर्वी हर्नियाची शस्त्रक्रिया झाली होती. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज अखेर हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांची प्राणज्योत मालवली. सिंधुताई यांच्यावर मागील महिनाभरापासून उपचार सुरु होते. त्यांच्यावर हर्निया संबंधित शस्त्रक्रिया झाल्यानंतर सुरुवातीला त्यांनी उपाचाराला प्रतिसाद दिला. मात्र, आज सकाळपासून त्यांनी उपचाराला प्रतिसाद देणं बंद केलं आणि रात्री 8 वाजून 10 मिनिटांनी त्यांचं निधन झाल्याची माहिती सिंधुताई यांचे निकटवर्तीय सुरेश वैराळकर यांनी दिली

सिंधुताई सपकाळ यांचा जीवनप्रवास
सिंधुताई सपकाळ यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1947 रोजी महाराष्ट्रातील वर्धा येथे झाला होता. वर्धा जिल्ह्यातील नवरगाव ही सिंधुताई यांची जन्मभूमी. त्यांचा विवाह वयाच्या 9 व्या वर्षी वयाने 26 वर्षांनी मोठे असलेल्या श्रीहरी सपकाळ यांच्याशी झाला होता. घरी प्रचंड सासुरवास होता. कुटुंबात शैक्षणिक वातावरण नव्हतं. नवऱ्याने चारित्र्याचा संशय घेऊन त्यांना घराबाहेर काढलं. घरच्यांनीही त्यांच्याकडे पाठ फिरवली. त्यामुळे परभणी-नांदेड-मनमाड रेल्वे स्टेशनांवर सिंधुताई भीक मागत हिंडायच्या. एकदा तर त्यांनी आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. अनेक दिवस भीक मागितल्यानंतर त्या स्मशानातही राहिल्या. त्यानंतर त्यांनी अनाथ मुलांना सांभाळण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी ममता बाल सदनची स्थापनाही केली. पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ही संस्था सुरु झाली. अनाथ, बेवारस मुलांना सांभाळतानाच त्यांना शिक्षण, अन्न, कपडे देण्यास त्यांनी सुरुवात केली. या संस्थेत 1 हजार 50 मुले या राहिलेली आहेत. त्यांनी पुण्यात बाल निकेतन, चिखलदरा येथे सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह, वर्ध्यात अभिमान बाल भवन, गोपिका गाईरक्षण केंद्र, सासवडमध्ये ममता बाल सदन आणि पुण्यात सप्तसिंधु महिला आधार बालसंगोपन व शिक्षण संस्थेची स्थापना केलीय.

Zodiac | ‘कुशाग्र बुद्धी’ , कोणतेही काम झटपट शिकतात या 4 राशींच्या व्यक्ती, तुमची रास यामध्ये आहे का?

VIDEO : पहिल्या सेकंदात वाटला छाटछुट स्टंट, व्हिडिओ पुढे सरकला अन् पोटात गोळाच उठला, काय हा जीवघेणा प्रकार?, पाहा व्हिडीओ! 

Pravin Darekar | भाजप नेते प्रविण दरेकर यांना कोरोनाची लागण, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आयसोलेशनमध्ये