Pravin Darekar | भाजप नेते प्रविण दरेकर यांना कोरोनाची लागण, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आयसोलेशनमध्ये

Pravin Darekar | भाजप नेते प्रविण दरेकर यांना कोरोनाची लागण, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आयसोलेशनमध्ये
प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

भाजप नेत्या पंकजा मुंडे, राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यासारख्या बड्या नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर आता विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनादेखील कोरोनाची लागण झाली आहे. ही माहिती खुद्द दरेकर यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटद्वारे दिली आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: prajwal dhage

Jan 05, 2022 | 12:39 PM

मुंबई : मागील अनेक दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच राज्यात ओमिक्रॉनबाधितांचेही प्रमाण वाढत आहे. तर दुसरीकडे नेतेमंडळी कोरोनाच्या विळख्यात अडकताना दिसत आहेत. भाजप नेत्या पंकजा मुंडे, राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यासारख्या बड्या नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर आता विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनादेखील कोरोनाची लागण झाली आहे. ही माहिती खुद्द दरेकर यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटद्वारे दिली आहे.

दरेकर यांच्यावर उपचार सुरु, संपर्कात आलेल्यांनी चाचणी करण्याचे आवाहन

भाजप नेते प्रविण दरेकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनासदृष्य लक्षणे आढळून आल्यानंतर त्यांनी आपली चाचणी करुन घेतली. त्यांतर आता त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार त्यांनी स्वत:ला विलगीकरणात ठेवलं असून उपचार सुरु केले आहेत. माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना कोरोनाची लक्षणे आढळल्यास तत्काळ चाचणी करुन घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

बड्या नेत्यांना कोरोनाची लागण 

याआधी राज्यातील अनेक बड्या नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, भाजप नेत्या तथा माजी मंत्री पंकजा मुंडे, काँग्रेसचे आमदार धीरज देशमुख, भाजप नेते सुजय विखे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे तसेच त्यांचे कुटुंबीय अशी अनेक नेतेमंडळी कोरोनाच्या विळख्यात अडकली आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.

रोहित पवार यांच्यावरही उपचार सरु

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. पुढील उपचारासाठी ते पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल झाले आहेत. महत्वाची बाब म्हणजे रोहित पवार 3 जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिकही मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

इतर बातम्या :

Sindhutai: ‘निघून गेल्या’ हा शब्द कृपया वापरू नका, ते एक वादळ होतं, आता… थरथरत्या आवाजात ममतांचं आवाहन

ये रिश्ता क्या कहलाता है?, रावसाहेब दानवे-अब्दुल सत्तारांची दिल्लीत गळाभेट

Nashik Corona| नाशिकमध्ये कोरोनाचा वणवा, रुग्णसंख्येचा विस्फोट झाल्याने बाधित हजारापल्याड


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें