ये रिश्ता क्या कहलाता है?, रावसाहेब दानवे-अब्दुल सत्तारांची दिल्लीत गळाभेट

ये रिश्ता क्या कहलाता है?, रावसाहेब दानवे-अब्दुल सत्तारांची दिल्लीत गळाभेट
shivsena leader abdul sattar

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि महाराष्ट्राचे मंत्री अब्दुल सत्तार यांचे संबंध जगजाहीर आहेत, असं विधान खुद्द शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनीच काही वेळापूर्वी केलं.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: भीमराव गवळी

Jan 05, 2022 | 12:02 PM

नवी दिल्ली: केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि महाराष्ट्राचे मंत्री अब्दुल सत्तार यांचे संबंध जगजाहीर आहेत, असं विधान खुद्द शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनीच काही वेळापूर्वी केलं. त्यानंतर रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार यांचा दिल्लीतील गळाभेटीचा फोटो समोर आला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

सध्या राज्यमंत्री अब्दुल सत्तार दिल्ली दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील रेल्वेच्या प्रलंबित मागण्यासाठी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. मात्र, भाजप-शिवसेना युतीचा पूल केवळ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेच बांधू शकतात, असं वक्तव्य शिवसेना नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार यांनी करून काही तास उलटत नाही तो, आता सत्तारांनी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांची गळाभेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

राजकीय भूकंप होणार?

अब्दुल सत्तार यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी जात दानवेंची गळाभेट घेतली. तसं सत्तार आणि दानवे यांची दोस्ती जुनीच आहे. पण काल शिवसेना-भाजप युतीबाबत सत्तार यांनी केलेल्या विधानानंतर दुसऱ्याच दिवशी झालेली ही भेट राज्यात राजकीय भूकंप तर आणणार नाही ना?, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.

म्हणून दानवेंना भेटलो

या भेटीनंतर सत्तार यांनी मीडियाशी संवाद साधला. माझ्या मतदारसंघातील रेल्वे संदर्भात मी त्यांना भेटण्यासाठी आलो. जळगाव-सोलापूर रेल्वे सुरू व्हावी म्हणून मी भेटण्यासाठी आलो होतो. मतदारसंघाचे खासदार झाले तर आनंद होईल. मी गंभीर नाही असं दानवे बोलतात. आता मी त्यांना रडत रडत सांगने, असं मिष्किल विधानही त्यांनी केलं.

ते माझं वैयक्तिक मत

यावेळी त्यांनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या टीकेलाही उत्तर दिलं. सर्व विषयावर बोलण्याचा अधिकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. माझं कालचं वक्तव्य वैयक्तिक आहे. पक्ष किंवा सरकार म्हणून नाही. माध्यमानी विचारलं म्हणून मी उत्तर दिलं, असं त्यांनी स्पष्ट केलं.

काय म्हणाले होते सत्तार?

उद्धव ठाकरे हे राज्यातील कर्तव्यदक्ष राजकारणी आहेत. महाराष्ट्राचे नेतृत्व ते उत्तम प्रकारे करत आहेत. तर नितीन गडकरी हे महाराष्ट्राचेच नाही तर देशाचे नेते आहेत. त्यामुळे भाजप-शिवसेना युतीचा पूल जोडायचं त्यांनी मनावर घेतलं तर ते उद्धव ठाकरे यांच्याकडे जातील, त्यांना विनंती करतील. कारण शेवटी भाजप-सेना युतीचा निर्णय उद्धव साहेबच घेऊ शकतात, असं अब्दुल सत्तार म्हणाले होते.

संबंधित बातम्या:

VIDEO: युती होणार की नाही? शिवसेनेतच जुंपली; चंद्रकांत खैरेंनी सत्तारांना फटकारलं

Sindhutai: ‘निघून गेल्या’ हा शब्द कृपया वापरू नका, ते एक वादळ होतं, आता… थरथरत्या आवाजात ममतांचं आवाहन

कोण आहेत प्रदीप कंद ज्यांच्या विजयानं अजित पवारांना ‘वाईट’ वाटलं?; भाजपनं पुणे बँक निवडणुकीत खातं कसं उघडलं?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें