चल दोस्ता ‘गटारी’ साजरी करु; पुण्यात चिकन मटणाच्या दुकानासमोर भल्या पहाटेच लागल्या रांगा 

Gatari Amavasya Pune : आषाढ महिन्याच्या अखेरचा रविवार खवय्यांचा आहे. उद्यापासून श्रावण सुरु होत आहे. रविवारचा योग जुळून आल्याने मांसाहारावर ताव मारण्यासाठी खवय्यांनी पुण्यात भल्या पहाटेच चिकन-मटणाच्या दुकानासमोर पुणेकरांनी रांगा लावल्या.

चल दोस्ता गटारी साजरी करु; पुण्यात चिकन मटणाच्या दुकानासमोर भल्या पहाटेच लागल्या रांगा 
गटारीसाठी सकाळी सकाळीच रांगा
| Edited By: | Updated on: Aug 04, 2024 | 9:14 AM

आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस आणि त्यातच रविवारचा योग साधून आल्याने खवय्ये भल्या पहाटेच सक्रिय झाले. उद्यापासून श्रावण सुरु होत आहे. आषाढचा अखरेचा रविवार साजरा करण्यासाठी सकाळीच चिकन-मटणाच्या दुकानासमोर पुणेकरांनी रांगा लावल्या. हे चित्र राज्यातील इतर पण शहरात दिसून आले. उद्यापासून मांसाहार वर्ज्य असल्याने आजच ताव मारण्याची योजना अनेकांनी केली आहे. श्रावण आणि त्यानंतर अनेक सणांची मालिका सुरु होणार आहे. त्यामुळे आजचा दिवस खवय्यांसाठी खास असणार आहे.

गटारीसाठी सकाळीच धावपळ

अनेकांनी आज जोरदार ‘गटारी’ साजरी करण्याचे नियोजन केलं आहे. त्याच निमित्ताने पुण्यात देखील चिकन, मटण दुकानाच्या बाहेर मोठ्या रांगा पाहायला मिळत आहेत. गटारी अमावस्या झाल्यानंतर सुरू होणाऱ्या श्रावण महिन्यात अनेक जण मांसाहार वर्ज्य करतात. त्याचमुळे आज पुणेकरांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली आहे. चिकन मटनच्या दरात काहीशी वाढ जरी झाली असली तरी सकाळी सहा वाजल्यापासूनच मटण आणि चिकनच्या दुकानाबाहेर पुण्यातील नागरिकांनी रांगा लावल्या आहेत.

दरवाढीची भीती

आज चिकन, मटणाची मागणी वाढणार आहे. त्यामुळे मटणाच्या आणि चिकनच्या दरात दुपारनंतर वाढीची भीती असल्याने ग्राहकांनी सकाळीच दुकानांसमोर गर्दी केली आहे. दरवाढ झाली तरी ग्राहकांकडून चिकन, मटण आणि मासळीची खरेदी होतेच. पण स्वस्तात अधिक मांस खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी सकाळीच दुकानांसमोर रांगा लावल्या आहेत.

आता ऑनलाईन पण फ्रेश चिकन, मटण, मासळी देण्याचा दावा करणारे अनेक फुड डिलिव्हरी ॲपचा सुळसुळाट झाला आहे. अनेक मोठ्या कंपन्या ग्राहकांना थेट घरपोच मांसाहाराची डिश पोहचवत आहे. त्यांना चिकन, मासळी पण घरपोच देत असल्याने अनेक ग्राहक या ॲपवर ऑर्डर देत आहेत. गेल्या काही वर्षांपासून फूड डिलिव्हरी कंपन्यांची यामुळे उलाढाल वाढली आहे. तर सकाळीच अनेक हॉटेल्स, रिसॉर्टनी गटारीची खास व्यवस्था केली आहे. निसर्ग, पर्यटन स्थळांवर ग्राहकांसाठी खास ऑफर आहेत. या ठिकाणी ग्राहकांनी गर्दी केल्याचे चित्र आहे. काहींनी तर शनिवारी रात्रीच या ठिकाणी मुक्काम ठोकला आहे. आजचा रविवार दिवसभर साजरा करण्याचे अनेकांचे नियोजन आहे.