AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nitin Gadkari : ग्रीन हायड्रोजन हे भविष्यातील इंधन; वाहन, विमानंही हायड्रोजनवरच चालणार, दौंडमध्ये नितीन गडकरींनी व्यक्त केलं मत

18व्या शतकात मोघल साम्राज्य, 19व्या शतकात इंग्रजांचे राज्य तर 21वे शतक भारताचे असल्याचे नितीन गडकरी म्हणाले. भारत विश्वगुरू बनेल. सर्वत्र विकास होऊन शहराकडे गेलेली माणसे पुन्हा गावाकडे परततील, असे नितीन गडकरी म्हणाले.

Nitin Gadkari : ग्रीन हायड्रोजन हे भविष्यातील इंधन; वाहन, विमानंही हायड्रोजनवरच चालणार, दौंडमध्ये नितीन गडकरींनी व्यक्त केलं मत
श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याच्या सीबीजी गॅस प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी नितीन गडकरीImage Credit source: tv9
| Edited By: Pradeep Garad | Updated on: Jun 18, 2022 | 12:58 PM
Share

दौंड, पुणे : ग्रीन हायड्रोजन हे (Green hydrogen) भविष्यातील इंधन आहे. विमाने, वाहने असे सर्व काही हायड्रोजनवर चालेल. ऊर्जेला निर्यात करणारा भारत देश बनवायचा आहे, आकलनापलिकडे असेल तर लोकांना समजत नाही. हायड्रोजनवर गाडी चालू शकते, हे दाखवण्यासाठी मी गाडी वापरत आहे. देशातील पहिला ट्रॅक्टर मी सीएनजीमध्ये (CNG) रुपांतरीत केला. सीएनजीचे रुपांतर बायोएनर्जीत केले तर गॅस वाहतुकीची समस्या सुटेल, असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी व्यक्त केले. श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याच्या सीबीजी गॅस प्रकल्पाचे उद्घाटन नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. कारखान्याचे अध्यक्ष पांडुरंग राऊत यांचा अमृत महोत्सवानिमित्त सत्कारही करण्यात आला. देशाला आर्थिक स्वयंशक्ती बनवले पाहिजे, अशी गरज त्यांनी व्यक्त केली.

बांबूपासून इथेनॉल

इंधन क्षेत्रात आलपा देश 10 लाख कोटींचे पेट्रोल-डिझेल आयात करतो. मात्र 10 लाख कोटी जे आयातीसाठी जातात, त्यामधील पाच कोटी इथेनॉलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळावेत, असे ते म्हणाले. तर बांबूपासूनही इथेनॉल तयार होत असल्याचे त्यांनी सांगितले. एक लिटर पेट्रोलमध्ये किती गाडी चालेल तितकीच एका लिटर इथेनॉलमध्ये चालेल. जनरेटर सेट इथेनॉलवर चालले पाहिजेत, यासाठी किर्लोस्कर यांना बोललो आहे. इथेनॉलचे उत्पादन वाढवा, साखर उत्पादन कमी करा तरच शेतकरी वाचेल, साखर उद्योग वाचेल, असे ते म्हणाले. शेतकरी अन्नदाता आहे. तो आता ऊर्जादाता बनला पाहिजे. त्याशिवाय आपले जग बदलणार नाही. त्याचबरोबर गावे आणि शेतकरी हा समृद्ध आणि संपन्न झाले पाहिजेत, अशी गरज त्यांनी व्यक्त केली.

‘प्रेमाने ऐकले तर ठीक, नाहीतर…’

वाहनविषयक कायदे करणे माझ्याच हातात आहे. सगळ्यांनी प्रेमाने ऐकले तर ठीक, नाहीतर कसे करून घ्यायचे ते मला माहीत, असे मिश्कीलपणे ते म्हणाले. दरम्यान, 18व्या शतकात मोघल साम्राज्य, 19व्या शतकात इंग्रजांचे राज्य तर 21वे शतक भारताचे असल्याचे नितीन गडकरी म्हणाले. भारत विश्वगुरू बनेल. सर्वत्र विकास होऊन शहराकडे गेलेली माणसे पुन्हा गावाकडे परततील. आम्ही अडचणीच्या काळात कारखाने सुरू केले. पाच गिनीज बुक रेकॉर्ड केले, असे त्यांनी सांगितले.

Follow Us
कल्याणमध्ये भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड
Kalyan : कल्याणच्या सहजानंद चौकात भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड, नेमकं काय घडलं?
पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट, नेमकं काय घडलं?
आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून....
Raj Thackeray : आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात
आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील..
Vivekanad Patil : आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील आक्रमक, MPSC अध्यक्षांना थेट इशारा
मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या....
Mangesh Chivte : मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या अर्ज भरणार, पण पुणे शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीत पेच कायम?
मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या....
Mumbai : मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या प्रस्तावावर संतापाचा सूर, पडद्यामागे काय घडतंय?
फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; गांधींचा ज्ञानेश कुमारांवर....
Rahul Gandhi : फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; राहुल गांधींचा ज्ञानेश कुमारांवर गंभीर आरोप, म्हणाले...
हनी सिंहच्या अडचणी वाढल्या?; महाराष्ट्र सायबरकडून समन्स, मात्र चौकशीला
honey singh : हनी सिंहच्या अडचणी वाढल्या?; महाराष्ट्र सायबरकडून समन्स, मात्र चौकशीला गैरहजर
आम्ही 2022 ला काहीतरी केलं....; शिरसाटांच्या विधानाने चर्चांना उधाण
Sanjay Shirsat : आम्ही 2022 ला काहीतरी केलं....; संजय शिरसाटांच्या त्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?...
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?; फडणवीसांची राज्यपालांकडे मोठी शिफारस, काय आहे मागणी?