सुप्रिया सुळे यांच्या ‘या’ कृत्यामुळे वारकरी संप्रदाय नाराज; भाजपने ‘तो’ मुद्दा उचलून धरला

संसदरत्न म्हणून घेणाऱ्या खासदारांकडून हे निंदनीय असे कृत्य झालेले आहे. त्यामुळे भाजपच्यावतीने आम्ही या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करतो असे मत भाजपने व्यक्त केले आहे.

सुप्रिया सुळे यांच्या या कृत्यामुळे वारकरी संप्रदाय नाराज; भाजपने तो मुद्दा उचलून धरला
| Edited By: | Updated on: May 23, 2023 | 8:19 PM

इंदापूर : बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी इंदापूर दौऱ्यावर असताना वरकुटे बुद्रुक येथे मांसाहार करून तेथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सभा घेतली होती. त्यावेळी त्यांनी अभिषेकही केला होता. मात्र त्यांनी ही निंदनीय प्रकार केल्याची भावना आता वारकरी भक्तांकडून व्यक्त केली जात आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्यामुळे महाराष्ट्राचे आराध्य दैवत व विठ्ठल-रुक्मिणीचे पाईक असणाऱ्या वारकरी सांप्रदाय आणि हिंदू धर्माच्या भावना दुखावल्या असल्याचे मत भाजपचे इंदापूर तालुकाध्यक्ष अॅड. शरद जामदार यांनी व्यक्त केले.

खासदार सुप्रिया सुळे यांनी मासांहार करुन मंदिरात गेल्यामुळे वारकरी संप्रदायातील भक्त नाराजी व्यक्त करत असून त्यांनी माफी मागावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.

यावेळी भाजपचे इंदापूर तालुकाध्यक्ष शरद जामदार यांनी म्हटले आहे की, त्यांच्या या कृत्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे त्यांनी नागरिकांची माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

खासदार सुप्रिया सुळे गुरुवारी (दि. 18) इंदापूर दौऱ्यावर होत्या. त्यावेळी त्यांनी वरकुटे बुद्रुक येथे सदर घडलेल्या घटनेची खातरजमा केली असता हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे.

संसदरत्न म्हणून घेणाऱ्या खासदारांकडून हे निंदनीय असे कृत्य झालेले आहे. त्यामुळे भाजपच्यावतीने आम्ही या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करतो असे मत भाजपने व्यक्त केले आहे. हिंदू धार्मियांच्या भावना दुखविण्याचे काम वेळोवेळी त्यांच्याकडून केले जात आहे.

तर समस्त वारकरी संप्रदाय हा विठ्ठल रुक्मिणीची भक्ती करतात, त्यांच्या धार्मिक भावना या घटनेमुळे दुखावल्या गेल्या आहेत, त्यामुळे खासदार सुळे यांनी या घटनेबाबत वारकरी सांप्रदाय आणि हिंदू समाजाची माफी मागण्याची गरज असल्याचे मत जामदार यांनी यावेळी व्यक्त केले .