Indapur | इंदापूरमध्ये छत्रपती संभाजीराजे यांना पाठिंबा देण्यासाठी ‘निमसाखर’ गाव एकवटले; घेतला ‘हा’ निर्णय

| Updated on: Feb 28, 2022 | 6:01 PM

खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या आमरण उपोषणला   निमसाखर ग्रामस्थ व ग्रामपंचायत निमसाखरकडून आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यात येत आहे. त्यास सभा सर्वानुमते मंजुरी देत आहे. असा ठराव मांडण्यात आला.

Indapur | इंदापूरमध्ये छत्रपती संभाजीराजे यांना पाठिंबा देण्यासाठी निमसाखर गाव एकवटले;  घेतला हा निर्णय
Sambhajiraje Chhatrapati
Follow us on

इंदापूर- मराठा समाजाला आरक्षण मिळावे.  या मागणीसाठी छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) हे मुंबई या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. त्यासाठी इंदापूर ( Indapur) तालुक्यातील निमसाखर, या ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी मासिक बैठक घेऊन बैठकीमध्ये खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या आमरण उपोषणला   निमसाखर ग्रामस्थ व ग्रामपंचायत निमसाखरकडून आंदोलनाला (Andolan)जाहीर पाठिंबा देण्यात येत आहे. त्यास सभा सर्वानुमते मंजुरी देत आहे. असा ठराव मांडण्यात आला. या ठरावाचे अध्यक्ष म्हणून धैर्यशील विजयसिह रणवरे (सरपंच निमसाखर) हे होते. सदर ठरावाचे सूचक शेखर संतोष पानसरे (ग्रामपंचायत सदस्य) तर अनुमोदक सुधीर केशव भोसले (ग्रामपंचायत सदस्य) हे होते. निमसाखर ग्रामपंचायतची सदस्य संख्या 17 आहे.

पाठिंबा देण्यासाठी इंदापुरात उपोषण

छत्रपती संभाजी राजे आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत. आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी इंदापूर तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने इंदापूर शहरातील प्रशासकीय भवनासमोर आज एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. सध्या या उपोषणात शेकडो सकल मराठा समाज दाखल झाला होता.

महादुग्धाभिषेक करत संभाजीराजेंच्या आरोग्यासाठी प्रार्थना

खासदार छत्रपती संभाजीराजेंच्या आंदोलनाला ग्रामीण भागातून पाठींबा मिळत आहे. मराठा समाजाच्या हक्काचे आरक्षण आणि इतर मागण्यासाठी आझाद मैदानावर आंदोलन सुरु आहे. आता या आंदोलनाला ग्रामीण भागातुन पाठिंबा मिळतोय. संभाजीराजेंच्या दिर्घकालीन आरोग्यासाठी प्रार्थना करत पुण्याच्या राजगुरुनगर येथे सिद्धेश्वर मंदिरात महादुग्धाभिषेक करत पठण करण्यात आले.

Kurla Balcony Collapsed : कुर्ल्यात शॉपिंग सेंटरचा छज्जा कोसळून पाच वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू

पुतिन हे 21 व्या शतकातील हिटलर, यूक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्याचं वक्तव्य

Pune crime| कौटुंबिक वादाला कंटाळल्याने पोलीस कर्मचाऱ्याने उचलले मोठे पाऊल…