AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: खासदार संभाजी छत्रपती यांच्या डोळ्यात अश्रू, तिसऱ्या दिवशीही उपोषण सुरूच

खासदार संभाजी छत्रपती यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस असून उपोषणाला बसलेल्या संभाजी राजे यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांचा चेहरा सुकलेला दिसत असून चेहऱ्यावर थकवा जाणवत आहे.

VIDEO: खासदार संभाजी छत्रपती यांच्या डोळ्यात अश्रू, तिसऱ्या दिवशीही उपोषण सुरूच
खासदार संभाजी छत्रपती यांच्या डोळ्यात अश्रू, तिसऱ्या दिवशीही उपोषण सुरूच
| Updated on: Feb 28, 2022 | 2:49 PM
Share

मुंबई: खासदार संभाजी छत्रपती यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस असून उपोषणाला बसलेल्या संभाजी राजे यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांचा चेहरा सुकलेला दिसत असून चेहऱ्यावर थकवा जाणवत आहे. मात्र, सरकारकडून अजूनही कोणतंही ठोस आश्वासन देण्यात आलेलं नाही. संभाजी छत्रपती (Sambhaji Chhatrapati) यांनी आज कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तब्बल 12 मिनिटे 28 सेकंद त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केलं. बोलत असताना त्यांचा आवाज क्षीण झालेला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या (chhatrapati shivaji maharaj) दैदिप्यमान कार्यावर बोलत असताना अचानक त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्यामुळे त्यांनी तात्काळ हाताने डोळे पुसण्यास सुरुवात केली. अनपेक्षितपणे घडलेला हा प्रसंग पाहून आझाद मैदानात (azad maidan) जमलेले शेकडो कार्यकर्तेही हेलावून गेले. राजेंच्या डोळ्यात अश्रू आलेले पाहून संपूर्ण परिसरात शांतता पसरली होती. कार्यकर्तेही गहिवरून गेले होते.

रामकृष्ण हरी. मी काय बोलावं? संत तुकाराम महाराज असतील, ज्ञानोबा असतील नामदेवराव महाराज असतील आणि विठ्ठल-रुक्मिणीचा आशीर्वाद घेण्यासाठी हे सगळे संत असतील आणि आपण सगळेजण. शिवाजी महाराजांनी भक्ती-शक्ती केल्यामुळे हे स्वराज उभं राहिलं आणि तो आशीर्वाद (राजेंच्या डोळ्यात पाणी)… मी छत्रपती शिवाजी महाराज, तुकोबांनी त्यांची ताकद वारकरी संप्रदायाने दिली होती. तिचं ताकद देण्यासाठी आपण इथे आलात, मी मनापासून आपला ऋणी आहे. छत्रपती केव्हा रडत नाहीत (डोळे पुसतात, तेव्हा कार्यकर्त्यांच्या जोरदार घोषणा सुरू होतात) पण छत्रपतींच्या डोळ्यात केव्हा अश्रू नसतात. तुमची भक्ती आणि आमची शक्ती यांने स्वराज निर्माण होतं. आपण तेच स्वराज निर्माण करण्यासाठी आलात, तुम्हा सर्वाचं आभार, असं संभाजी राजे म्हणाले.

दिवसातून तीन वेळा तपासणी

दरम्यान, डॉक्टर दिवसातून तीन वेळेस त्यांची तपासणी करत आहेत. सकाळी तपासणी केल्यानंतरही डॉक्टरांना राजेंच्या रक्तातील साखर कमी झाल्याची आढळली. त्यांनी राजे यांना इंजेक्शन घेण्याचा सल्ला दिला. मात्र, राजेंनी त्यालाही नकार दिला. आत्ता थोड्या वेळापूर्वी पुन्हा एकदा आझाद मैदानावर रुग्णवाहिका दाखल झालीय. डॉक्टरांनी छत्रपती संभाजी राजे यांच्या साखरेची पातळी तपासली. रक्तदाब तपासला. तेव्हा राजे यांचा रक्तदाब कमी झाल्याचे आढळले. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना डॉक्टरांचा रूग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला.

उपोषणावर ठाम

डॉक्टरांनी रुग्णालयात दाखल केल्यानंतरही संभाजी छत्रपती सध्या उपोषणावर ठाम आहेत. हा भावीपिढीच्या उज्वल भविष्यासाठीचा लढा आहे. तो सुरूच ठेवणार, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. राजे यांच्या ट्वीटर हँडलवरूनही तसे ट्वीट करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या:

VIDEO: महाराष्ट्रात निवडणुका असत्या तर ‘ऑपरेशन सह्याद्री’ असतं; ‘ऑपरेशन गंगा’वरून राऊतांचा केंद्राला टोला

Maratha Reservation | महाराष्ट्र सरकारकडून छत्रपती संभाजी राजेंना चर्चेचे निमंत्रण; शिष्टाईचे प्रयत्न सुरू

Maratha Reservation | छत्रपतींची तब्येत बिघडली; डॉक्टरांचा रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला, पण राजे ठाम

Follow Us
झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी!
Zeeshan Siddique | झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी! थेट मुंबई आयुक्तांना फोन; फडणवीसांनाही दिली माहिती
अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार
Abhijit Dipke | अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार; नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
Mumbai | तुकाराम मुंढे यांचा Domino’s ला दणका! मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?