AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यातील कुंडमळा दुर्घटनेतील पुलाप्रमाणे भीमा नदीवरील पूल धोकादायक, पुलाला मोठे भगदाड असतानाही पर्यटकांची होते गर्दी

Indrayani River Bridge Collapses : भीमा नदीवर सुमारे अठरा वर्षांपूर्वी पूल बांधण्यात आला होता. या पुलाच्या कामाच्या दर्जाबाबत नेहमीच प्रश्न उपस्थित केला जात असतो. या पुलास गेल्या काही वर्षांत अनेक ठिकाणी भगदाड पडले आहे.

पुण्यातील कुंडमळा दुर्घटनेतील पुलाप्रमाणे भीमा नदीवरील पूल धोकादायक, पुलाला मोठे भगदाड असतानाही पर्यटकांची होते गर्दी
धरणातील पाणी सुटल्यावर पर्यटकांची या धोकादायक पुलावर गर्दी होते.
| Updated on: Jun 16, 2025 | 9:31 AM
Share

Indrayani River Bridge Collapses : पुण्यातील मावळ तालुक्यात रविवारी धक्कादायक घटना घडली. तळेगाव दाभाडे शहराजवळील प्रसिद्ध पर्यटनस्थळ कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर असलेला जूना पूल कोसळला आहे. त्यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला. तसेच सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. पूल पडल्यानंतर वाहून गेलेल्या अनेकांना वाचवण्यात यश आले आहे. कुंडमळाप्रमाणे पुण्याच्या खेड तालुक्यातील चास कमान धरणाच्या भिंतीला समांतर असणाऱ्या भीमा नदीवरील पूल धोकादायक झाला आहे. या पुलाला मोठे भगदाड पडले आहे. यामुळे पूल पडून मोठी दुर्घटना होण्याचा धोका आहे. धरणातून पाणी सुटल्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी होत असते.

पर्यटकांची होत असते गर्दी

भीमा नदीवर सुमारे अठरा वर्षांपूर्वी पूल बांधण्यात आला होता. या पुलाच्या कामाच्या दर्जाबाबत नेहमीच प्रश्न उपस्थित केला जात असतो. या पुलास गेल्या काही वर्षांत अनेक ठिकाणी भगदाड पडले आहे. त्याची अनेक वेळा डागडुजी करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यानंतर पूल कमकुवत आहे. या पुलावरील रेलिंगही अनेक ठिकाणी तुटले आहेत. चास कमान धरणाचे पाणी सुटल्यानंतर मोठ्या संख्येने पर्यटक वर्षाविहार करण्यासाठी या ठिकाणी येत असतात. त्यामुळे या पर्यंटकांनाही मोठा धोका होण्याचा शक्यता आहे.

धोकादायक पुलावर वाहतूक सुरुच आहे.

भीमा नदीवरील हा पूल धोकादायक बनला असतानाही त्या ठिकाणी वाहतूक सुरु आहे. ज्या ठिकाणी भगदाड पडले आहे, त्या ठिकाणी स्थानिक लोकांनी दगड आणि झाडांच्या फांद्या ठेऊन वाहन चालकांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. या पूर्वीही पुलावर विविध ठिकाणी भगदाड पडल्याने पुलावरून होणाऱ्या वाहतुकीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र, धरण प्रशासन याबाबत डोळ्यावर पट्टी बांधून आहे. यामुळे मोठ्या दुर्घटनेची वाट प्रशासन पाहत तर नाही ना? असाही प्रश्न या भागातील नागरिक उपस्थित करत आहे.

कुंडमळाचे बचावकार्य एनडीआरएफकडून थांबवले

कुंडमळा येथील पूल पडल्यानंतर अनेक जण वाहून गेले होते. त्यावेळी बचावकार्यासाठी एनडीआरएफच्या पथकाला बोलवण्यात आले होते. रात्री बचावकार्य थांबण्यात आले होते. आता सोमवारी एनडीआरएफला बचाव कार्याबाबत कोणतीही सूचना देण्यात आलेल्या नाही. मिसिंगची तक्रार नसल्याने प्रशासनाने एनडीआरएफला पाचारण केलेले नाही. त्यामुळे आजचे बचावकार्य खाजगी बचाव पथकांकडून केले जाईल, अशी माहिती मावळ तहसीलदार विक्रम देशमुख यांनी दिली.

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.