चौघांचा गाडीवर प्रवास, चौघेही नदीच्या पाण्यात पडले, सात वर्षाच्या पोरीने बापाला वाचवलं, आजी नातवाचा बुडून मृत्यू

| Updated on: Mar 07, 2021 | 6:06 PM

संरक्षण कठडा नसलेल्या फरशी पुलावरुन दुचाकी नदीत पडल्याने झालेल्या दुर्घटनेत आजी व नातवाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी कराड तालुक्यातील आंबवडे कोळे येथे घडली. | River

चौघांचा गाडीवर प्रवास, चौघेही नदीच्या पाण्यात पडले, सात वर्षाच्या पोरीने बापाला वाचवलं, आजी नातवाचा बुडून मृत्यू
आजी नातवाचा दुर्दैवी बुडून मृत्यू
Follow us on

कराड : संरक्षण कठडा नसलेल्या फरशी पुलावरुन दुचाकी नदीत पडल्याने झालेल्या दुर्घटनेत आजी व नातवाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी कराड तालुक्यातील आंबवडे कोळे येथे घडली. वांग नदीवर (Wang River) असणाऱ्या फरशी पुलावरून दुचाकीवरून प्रवास करणाऱे संरक्षक कठडा नसल्याने दुचाकी पुलावरून डोहात पडुन चौघे पाण्यात बुडाले मात्र दुचाकीवरील पोहता येत असलेल्या सात वर्षाच्या मुलीने पित्याचे प्राण वाचवले मार पाण्यात पडलेल्या दुचाकीवरील आजीचं नातवाचा बुडून मृत्यू झाला. (Karad Grandmother grandson drowned in Wang River)

एकाच दुचाकीवरुन चौघे प्रवास करत होते. मालन भगवान यादव (वय 57), पियुष शरद यादव (वय 4, रा. येरवळे ता. कराड) असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. या घटनेची कराड पोलिसात नोंद झाली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

देवदर्शनावरुन घरी परतत होते पण नियतीच्या मनात वेगळं होतं…

कराड तालुक्यातील येरवळे येथील एकाच कुटुंबातील चौघेजण शरद यादव (आई) मालन यादव समवेत दोन मुले तनुजा अणि पियुष दुचाकीवरून अंबवडे येथे देवदर्शनासाठी गेले होते. देवदर्शन घेऊन ते घरी परतत होते. परतताना पुलावरून दुचाकी त्यांची दुचाकी घसरली. त्याठिकाणी जुन्या पुलाचे बांधकाम सुरु असून खडी व वाळू त्याठिकाणी पसरली आहे. त्यामुळे फसगतीने चौघेही दुचाकीसह साधारण 20 फुट खोल नदीच्या डोहात पडले अणि बुडाले.

मुलीने बापाला वाचवलं पण…

तिघांनाही पोहता येत नव्हते. प्रसंगावधान राखून पोहण्यात तरबेज असलेल्या तनुजाने बुडत असलेल्या आजीला अणि भावाला ओढत आणुन पाण्याबाहेर काढले. काठावर आणले. पुन्हा शर्थीचे प्रयत्न करून वडिलांना पाण्याबाहेर काढण्यासाठी ती पुन्हा पाण्यात गेली. बाहेर काढत असताना तोवर काठावरील आजी अणि भाऊ पुन्हा घसरून पाण्यात पडली.

घटनेची माहिती मिळताच येरवळेसह परिसरातील नागरिकांनी धाव तिकडे घेतली. पोलिसांना कळविण्यात आले. शोध मोहिम राबविली. त्यानंतर भावाला बाहेर काढण्यात यश आले. मात्र नियतीने तोवर डाव साधला अन् आजी अणि नातवाचा जीव त्यात गेला.

तिने पुरेपूर प्रयत्न केला पण…

वडील शरद यादव यांना वाचविण्यात तनुजा यशस्वी ठरली. आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी तिने केलेले धाडस वाखाणण्याजोगे ठरले. तेही केवळ सात वर्षाच्या जिगरबाज मुलीने जिवाची पर्वा न करता पोहण्याचा कलेचा पुरेपूर वापर करत तिघाचाही जीव वाचवण्यासाठी शर्थीने प्रयत्न केले खरे मात्र तिच्या धडपडीला पुर्णत: यश आले नाही. आजी अणि भावाचा दुर्दैवी मृत्यु झाला.

हे ही वाचा :

OMG! अचानक सोन्याचा डोंगर सापडला; लोकांची सोनं लुटण्यासाठी अलोट गर्दी, व्हिडीओ व्हायरल

48% ‘मॉमस्’ विवाहबाह्य संबंधात, नव्या सर्वेचा निकाल धक्कादायक, वाचा आणखी काय काय घडतंय महिलांच्या विश्वात?