AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

48% ‘मॉमस्’ विवाहबाह्य संबंधात, नव्या सर्वेचा निकाल धक्कादायक, वाचा आणखी काय काय घडतंय महिलांच्या विश्वात?

जागतिक महिला दिवस आता तोंडावर आहे आणि महिलांचं जग वेगानं बदलत असल्याचं दिसून येत आहे.

48% 'मॉमस्' विवाहबाह्य संबंधात, नव्या सर्वेचा निकाल धक्कादायक, वाचा आणखी काय काय घडतंय महिलांच्या विश्वात?
| Edited By: | Updated on: Mar 07, 2021 | 10:35 PM
Share

मुंबई : जागतिक महिला दिवस आता तोंडावर आहे आणि महिलांचं जग वेगानं बदलत असल्याचं दिसून येत आहे. एकेकाळी घरात चूल आणि मूल सांभाळणारी महिला आता नोकरी व्यवसायासाठी पुरुषांइतकीच घराबाहेर आहे आणि त्याच अनुषंगानं तिचे नातेसंबंधही वेगानं बदलत आहे. एका नव्या सर्वेनुसार विवाहबाह्य संबंधात असलेल्या महिलांची संख्या मोठी असल्याचं उघड झालं आहे. (48 percent of ‘moms’ in extramarital affairs gleeden Survey)

काय आहेत सर्वेची निरीक्षणं?

ग्लिडेन ह्या पोर्टलनं भारतीय महिलांचा सर्वे केला. त्यांच्या निरिक्षणानुसार विवाहबाह्य संबंधात असलेल्या 48 टक्के महिला ह्या मॉम म्हणजेच आई आहेत. अशा संबंधात असलेल्या 78 टक्के महिला ह्या उच्च शिक्षित तर आहेतच पण 74 टक्के महिला ह्या नोकरी व्यवसायात उच्चपदस्थही आहेत. त्यामुळे कामासाठी बाहेर पडलेल्या महिलांच्या गरजा, त्यांच्या अपेक्षा वेगानं बदलताना दिसत आहेत.

इतर कोणती निरीक्षणं आहेत सर्वेची?

ग्लिडेननं वय वर्ष 30 ते 60 दरम्यान असलेल्या महिलांचा सर्वे केला आहे. ग्लिडेन हे महिलांनीच एक्स्ट्रा मॅरीटल अफेयर्ससाठी डिझाईन केलेलं पोर्टल असून त्याचा युजरबेस हा 10 लाख आहे. त्यामुळेच सर्वेतली निरिक्षणं महत्वाची आहेत. विवाहबाह्य संबंधाचं मुख्य कारण हे वैवाहिक जीवनात असलेलं बोअरडम आहे. आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आणि सक्षम असल्यामुळे आयुष्यातला डलनेस किंवा बोअरडम घालवण्यासाठी असे निर्णय घेतल्याचं सर्वेतून पुढं आलं आहे. यात 76 टक्के महिला अशाही आहेत ज्या स्वत:ला पार्टनरपेक्षा जास्त शारीरिकदृष्ट्या स्मार्ट समजतात. 64 टक्के अशा आहेत, ज्या सेक्सच्या दृष्टीनं समाधानी नाहीत. 60 टक्के अशा आहेत, ज्यांच्या जीवनात लग्न असूनही नवऱ्यासोबत कुठलेही लैंगिक संबंध नाहीत.

हेही लक्षात असू द्या

विवाहबाह्य संबंधामुळे आधी अपराधी भावना यायची पण आता तीही गायब होत असल्याचं विवाहबाह्य संबंधात असलेल्या महिलांचं म्हणनं आहे. जमाना बदलतोय आणि त्यात आता हुक अपस, पेड सेक्स, सायबर सेक्स, अशा गोष्टींची अपराधी भावन होतच नसल्याचं दिसून येतं आहे.

2019 साली काय निरीक्षणं होती सर्वेची?

ग्लिडेननेच दोन वर्षापुर्वीही असाच सर्वे केलेला होता आणि त्यात 77 टक्के महिला ह्या विवाहबाह्य संबंधात असल्याचं निरिक्षण नोंदवलेलं होतं. विशेष म्हणजे सेम सेक्स संबंधात 45 टक्के वाढ झाल्याचेही उघड झाले होते. सुप्रीम कोर्टानं असे संबंध गुन्हा नसल्याचं जाहीर केल्यानंतर यात वाढ झाली होती. वैवाहिक जीवनातलं तोच तोचपणा हे एकमेव कारण विवाहबाह्य संबंधांसाठी असल्याचं निरिक्षण नोंदवलं गेलं होतं.

संबंधित बातम्या : 

पालावरच्या मुलांच्या शिक्षणासाठी आधुनिक सावित्रीची धडपड, पोलीस कॉन्स्टेबल संगीता ढोलेंचा प्रवास प्रकाशाकडे उपक्रम

(48 percent of ‘moms’ in extramarital affairs gleeden Survey)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.