AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या, मंत्र्यांसारख्या व्यक्तींचा सहभाग असल्याचं समजणं दुर्भाग्यपूर्ण: रक्षा खडसे

महिलांवरील अत्याचाराच्या प्रमाण वाढत होतेय त्यामुळे आपली महाराष्ट्रातली संस्कृती कुठे चालली आहे, याचा विचार केला पाहिजे, असं खासदार रक्षा खडसे म्हणाल्या. Raksha Khadse MVA Government

राज्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या, मंत्र्यांसारख्या व्यक्तींचा सहभाग असल्याचं समजणं दुर्भाग्यपूर्ण: रक्षा खडसे
रक्षा खडसे, भाजप खासदार, रावेर
Yuvraj Jadhav
Yuvraj Jadhav | Updated on: Feb 15, 2021 | 6:15 PM
Share

जळगाव: रावेर मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे यांनी वाढीव वीज बिलाच्या मुद्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. महाविकासआघाडी सरकारने शेतकऱ्यांना कृषी पंपाचे संपूर्ण वीज बील माफ करु, असं आश्वासन दिले होते. मात्र, त्यांच्या ऊर्जा मंत्र्यांनी शब्द बदलून टाकले हा दुःखाचा दुर्भाग्याचा विषय आहे, असं रक्षा खडसे म्हणाल्या. महिला अत्याचाराच्या घटना महाराष्ट्रात पुढे येत आहेत. त्यात काही मोठे लोक आणि मंत्र्यांसारख्या व्यक्तींचा सहभाग असल्याचं कळतं हा दुःखाचा विषय आहे, असं त्या म्हणाल्या. (Raksha Khadse slams MVA Government on electricity bill and woman safety issue)

अचानक वीज कापून शेतकऱ्यांसमोरील अडचणी वाढवल्या

वीज बिलांसाठी अचानक संपूर्ण शेतकऱ्यांचे कनेक्शन पूर्वसूचना न देता कट केले जात आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न घेण्याचे दिवस आहेत,सरकारला हे माहिती असताना वीज कापली जातीय. शेतकऱ्यांचे हित न पाहता महाविकासआघाडी सरकारने वीज वितरण कंपनीला वीज कापण्याचे आदेश दिले आहेत. शेतकऱ्यांची वीज कनेक्शन कट केली जात असून शेतकऱ्यांची दुरवस्था केली आहे, असं खासदार रक्षा खडसे म्हणाल्या. त्यांनी वीज वितरण कंपनीला व मुक्ताईनगर तहसीलदार कार्यालयाला भाजपच्यावतीने निवेदन दिले आणि सरकारचा निषेध केला.

महाराष्ट्राची संस्कृती कुठे चाललीय?

राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या प्रमाण वाढत होत आहे. त्यामुळे आपली महाराष्ट्रातली संस्कृती कुठे चालली आहे, याचा विचार केला पाहिजे, असं खासदार रक्षा खडसे म्हणाल्या. महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. महिला अत्याचाराच्या घटना महाराष्ट्रात पुढे येत आहेत. त्यात काही मोठे लोक आणि मंत्र्यांसारख्या व्यक्तींचा सहभाग असल्याचं कळतं हा दुःखाचा विषय आहे. त्यामुळे आपली महाराष्ट्रातील संस्कृती कुठे चालली आहे असा सवाल त्यांनीकेला.

एकीकडे महिलांचा सन्मान ,महिलांना आरक्षण म्हणायचं आणि पदावर बसणाऱ्यांकडूनचं महिलांवर अत्याचार होत असतील, तर यापेक्षा दुःखाचा विषय महाराष्ट्रासाठी काय असेल अशी संतप्त प्रतिक्रिया मुक्ताईनगर येथे रावेर लोकसभा मतदार संघाच्या खासदार रक्षा खडसे केला. जळगावच्या यावल दरम्यान 15 मजूरांचा मृत्यू होणे, अत्यंत दुर्दैवी घटना आहे. या घटनेने जिल्हा हादरला आहे, असंही रक्षा खडसे म्हणाल्या.

संबंधित बातम्या:

कोरोना पुढील काळात आणखी धोकादायक, परिस्थिती बिघडू शकते, बिल गेटस यांचा इशारा

महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना मृत्युदंड, सोशल मीडियातून त्रास दिल्यास शिक्षा; ‘शक्ती’ विधेयक तयार करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी (Raksha Khadse slams MVA Government on electricity bill and woman safety issue)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...