AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Protest against hijab ban | कर्नाटकच्या हिजाब बंदीचे पुण्यात पडसाद ; फुले वाड्यावर आंदोलन करत ,भाजपच्या केला निषेध

मुस्लीम समुदायाच्या मुलींना कॉलेजमध्ये हिजाब वापरल्याने कॉलेजमध्ये प्रवेशबंदी केली होती. त्यामुळे मुस्लीम समुदायातील मुलींना या निर्णयाच्या विरोधात आंदोलन केले होते. मुस्लीम समुदायातील मुलींना पाठींबा दर्शवत महात्मा फुले वाड्याजवळ राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर निषेध आंदोलन करत

Protest against hijab ban |  कर्नाटकच्या हिजाब बंदीचे पुण्यात पडसाद ; फुले वाड्यावर आंदोलन करत ,भाजपच्या केला निषेध
Hijab ban andolan
Reporter Ashwini Satav Doke
Reporter Ashwini Satav Doke | Edited By: प्राजक्ता ढेकळे | Updated on: Feb 10, 2022 | 3:18 PM
Share

पुणे – कर्नाटकमध्ये मुस्लिम समुदायाच्या मुलींना हिजाब वापरण्यास बंदी(Prohibition on wearing hijab)घालणाऱ्या कर्नाटक भाजप सरकारचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (Nationalist Congress Party) वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. गंज पेठेतील फुले वाड्यात हे आंदोलन करण्यात आलं. मुस्लिम महिलांसह (Muslim women)इतरही महिला पारंपरिक वेशभूषेत महिला आंदोलक सहभागी झाल्या होत्या.  कर्नाटकमधील काही कॉलेज कॅम्पसमध्ये हिजाबवर बंदी घालण्याची मागणी याचिका उच्च न्यायालयात नोंदवली गेली होती. ‘कर्नाटकात मुस्लीम मुलींसोबत झालेला प्रकार अत्यंत निंदनीय आहे. देशात भाजप आणि आरएसएस सध्या महिलांचे जीवन असुरक्षित करत आहेत’, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला. कर्नाटकमध्ये हिजाबवरून सुरू असलेला वादाचे देशभर गाजत आहे.

 महाराष्ट्रातही पडसाद  

मुस्लीम समुदायाच्या मुलींना कॉलेजमध्ये हिजाब वापरल्याने कॉलेजमध्ये प्रवेशबंदी केली होती. त्यामुळे मुस्लीम समुदायातील मुलींना या निर्णयाच्या विरोधात आंदोलन केले होते. मुस्लीम समुदायातील मुलींना पाठींबा दर्शवत महात्मा फुले वाड्याजवळ राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर निषेध आंदोलन करत कर्नाटकमधील भाजप सरकारचाही निषेध नोंदवला.

नेमकं प्रकरण काय

कर्नाटकातील एका महाविद्यालयाने हिजाब काढण्यास नकार देणाऱ्या सहा विद्यार्थिनींना प्रवेशबंदी केली होती. मात्र हिजाब घालूनच आम्ही महाविद्यालयात येऊ, अशी भूमिका या विद्यार्थिनींनी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून घेतली आहे. त्या प्रकरणावरुन सध्या कर्नाटकात वादंग निर्माण झाला आहे. हिजाब घालणाऱ्या युवतींचा विरोध म्हणून काही संघटना भगवी शाल अंगावर घालून कॉलेजमध्ये येण्याचा प्रयत्न करत आहेत. याबरोबर हिजाब घालून महाविद्यालयात आलेल्या तरुणीला अडवण्याची प्रयत्नही करण्यात आला. यावेळी ‘जय श्रीराम च्या घोषणात देत , भगवे झेंडे हात घेऊन तरुणांच्या जमावाने गोंधळ घातला होता.

Ajinkya Rahane: ऑस्ट्रेलियात मी निर्णय घेतले पण श्रेय दुसऱ्यानेच घेतलं, अजिंक्य रहाणेच्या विधानाचा रोख नेमका कोणाकडे?

Aurangabad | जगप्रसिद्ध वेरुळ लेणीसमोरील कीर्तिस्तंभ हटवण्याचा निर्णय, जैन समाजात नाराजी, काय आहे वाद?

A Thursday Trailer : यामी गौतमच्या ‘A Thursday’ चित्रपटाचा ट्रेलर आऊट, दोन तासात एक मिलियनहून अधिक views

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?