Ketan Agarwal Case: 2 वेळा फेल झाल्यानंतर 3 कट यशस्वी! थेट सापाचाच बनाव, सियाचे हादरुन टाकणारे कट समोर

Ketan Agarwal Case: केतन अग्रवाल प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. सियाने दोन वेळा केतनची हत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तिसऱ्यांदा तिचा कट यशस्वी झाला.

| Updated on: Jun 23, 2026 | 6:54 PM
1 / 5
सध्या पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवालच्या हत्येची जोरदार चर्चा सुरु आहे. केतनचे लग्न सिया गोयलशी ठरले होते. लग्नासाठी दोन विमाने, एक महाल, आलिशाय गाड्या वैगरे बूक करण्यात आल्या होत्या. जवळपास 14 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. मात्र, सियाला हे लग्न मान्य नव्हते. तिने थेय केतनला दोन वेळा मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिसऱ्यांदा तिचा प्रयत्न यशस्वी झाला.

2 / 5
६ जून रोजी प्री वेडिंग शुटिंगसाठी मुंबईहून इंडोनेशिया बालीला जाणार होते. चारजण गाडीत होते. माझी मुलगी, मुलगा, सिया आणि तिचा भाऊ साहील.  सर्वांनी पासपोर्ट आणि करन्सी चेक केली. क्रेडिट कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स. एकाच पाऊचमध्ये सर्व ठेवलं. पाऊच गाडीत होतं. फूड मॉलमध्ये गेले. सिया म्हणाली गाडीत मोबाईल विसरली. ती एकटीच गेली. नंतर विमानतळावर गेले. त्यावेळी सर्वांचे पासपोर्ट होते. पण केतनचा नव्हता. वाटलं की तो कुठे पडला असेल का. त्याने शोधला. सापडला नाही. त्यामुळे ते सर्व विमानतळावरून परत आले.

3 / 5
सियाने चार दिवसानंतर त्याच्यासोबत राडा केला आणि भांडण केलं. लोहगडला जायचा हट्ट धरला. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, सिया आणि केतन यांच्यात काही कारणांवरून वाद होत होते. 4 जून रोजी ट्रेकिंगला जाण्याबाबतही चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे.

4 / 5
१४ जून २०२६ रोजी परत लोहगडला गेले. दोघेच होते. त्याच ठिकाणी तिने केतनला धक्का मारला. केतन मागे सरकला. मागे झुडूप हाती लागलं. त्याला धरून तो वाचला. धक्का मारून वाचला आणि वाचलो, असं त्याला वाटायला लागलं तेव्हा तिने साप आला साप आल्याचा बनाव केला आणि त्याला जाऊन मिठी मारली. असं वाटलं साप आला म्हणून तिने धक्का मारला आणि वाचला गेला. तिने तेव्हा त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला.

5 / 5
एका तरुणाचा मृत्यू, लग्नाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या कुटुंबांवर आलेलं संकट आणि खुनाच्या आरोपांनी गाजत असलेलं हे प्रकरण सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे.मात्र या प्रकरणातील आरोपींवरील आरोप अद्याप न्यायालयात सिद्ध व्हायचे आहेत. त्यामुळे सत्य नेमकं काय, याचा अंतिम निर्णय न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होणार आहे.

Follow Us