AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘साडी शस्त्र’ प्रदर्शनातून राष्ट्रीय हातमाग परंपरेला सलाम; राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त भव्य कला प्रदर्शनाचे उद्घाटन

Saree Shastra : साडी शस्त्र या भारताच्या समृद्ध हातमाग परंपरेला समर्पित कला-ऐतिहासिक प्रदर्शनाचे उद्घाटन आज राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त नवी दिल्लीत करण्यात आले.

'साडी शस्त्र' प्रदर्शनातून राष्ट्रीय हातमाग परंपरेला सलाम; राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त भव्य कला प्रदर्शनाचे उद्घाटन
saree shastra
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Aug 07, 2026 | 8:58 PM
Share

नवी दिल्ली, 7 ऑगस्ट 2026 : साडी शस्त्र या भारताच्या समृद्ध हातमाग परंपरेला समर्पित कला-ऐतिहासिक प्रदर्शनाचे उद्घाटन आज राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त नवी दिल्लीतील इंडिया इंटरनॅशनल सेंटरच्या (IIC) कमलादेवी कॉम्प्लेक्समधील आर्ट गॅलरीत करण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या हस्ते झाले. यावेळी भारतीय प्रशासकीय सेवा अधिकाऱ्यांच्या पत्नी संघटनेच्या (IASOWA) अध्यक्षा हेमा सोमनाथन प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. तसेच इंडिया इंटरनॅशनल सेंटरचे संचालक के. एन. श्रीवास्तव यांचीही उपस्थिती होती.

शिखाज् करिगरी या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेले ‘साडी शस्त्र’ हे प्रदर्शन साडीला केवळ परिधानाचा भाग म्हणून नव्हे, तर भारताचा इतिहास, सांस्कृतिक वारसा आणि समृद्ध हस्तकलेचे जिवंत प्रतीक म्हणून सादर करते. प्रदर्शनात देशभरातील हातमागावर विणलेल्या, हाताने रंगवलेल्या, भरतकाम केलेल्या तसेच GI प्रमाणित वस्त्रांचा समावेश आहे.

प्रदर्शनाची संकल्पना पुढील संस्कृत श्लोकावर आधारित आहे

“यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः।”

जिथे स्त्रियांचा सन्मान केला जातो, तिथे देवतांचा वास असतो.

या प्रदर्शनातून भारतीय वस्त्रपरंपरेला समृद्ध करणाऱ्या असंख्य महिला, विणकर आणि कारागिरांच्या सर्जनशीलतेला, कौशल्याला आणि योगदानाला मानवंदना अर्पण करण्यात आली आहे. प्रत्येक साडी ही स्त्रीची ओळख, आत्मसन्मान, संघर्ष, सक्षमीकरण आणि अभिमानाची कहाणी सांगते, असा संदेश या प्रदर्शनातून देण्यात आला.

‘स्वदेशी’ला प्रोत्साहन देण्याचे आवाहन

कार्यक्रमात बोलताना केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी भारतातील हातमाग परंपरेचा गौरव करताना सांगितले की, पिढ्यानपिढ्या विणकर आणि कारागिरांनी जपलेल्या या परंपरेचा सन्मान करणे ही काळाची गरज आहे. भारतातील विविध राज्यांच्या संस्कृतींना जोडणाऱ्या अशा उपक्रमांमुळे ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ ही संकल्पना अधिक बळकट होते. त्यांनी स्वदेशीचा स्वीकार करण्याचे आणि आत्मनिर्भर भारताच्या सांस्कृतिक परंपरांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले.

प्रत्येक साडी ही संघर्ष आणि सन्मानाची कहाणी

IASOWA च्या अध्यक्षा हेमा सोमनाथन यांनी भारतीय कला आणि महिलांमधील नात्यावर प्रकाश टाकताना सांगितले की, ‘साडी शस्त्र’ हे प्रदर्शन प्रत्येक साडीशी जोडलेल्या संघर्ष, जिद्द, आत्मविश्वास आणि अभिमानाच्या कथा लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न आहे.

भारतीय कला जपण्यासाठी महत्त्वाचे व्यासपीठ

इंडिया इंटरनॅशनल सेंटरचे संचालक के. एन. श्रीवास्तव यांनी शिखा अजमेरा यांच्या प्रयत्नांचे कौतुक करत भारतीय कला आणि हस्तकलेच्या जतनासाठी हे प्रदर्शन महत्त्वाचे व्यासपीठ ठरेल, असे सांगितले.

शिखाज् करिगरीच्या संस्थापक शिखा अजमेरा यांनी सांगितले की, अनेक ठिकाणी आपली कला सादर करण्याची संधी मिळाली असली तरी इंडिया इंटरनॅशनल सेंटरमध्ये हे प्रदर्शन आयोजित करणे आमच्यासाठी अत्यंत विशेष आहे. हे केवळ आमच्या ब्रँडचे प्रदर्शन नसून, भारताला जागतिक वस्त्रवारशाचे केंद्र बनविणाऱ्या विणकर, कलाकार आणि कारागिरांच्या अथक परिश्रमांना वाहिलेली आदरांजली आहे.

9 ऑगस्टपर्यंत चालणार प्रदर्शन

कला इतिहासकार आणि क्युरेटर आदित्य के. झा यांच्या संकल्पनेतून साकारलेले हे तीन दिवसीय प्रदर्शन 9 ऑगस्ट 2026 पर्यंत सुरू राहणार आहे. या प्रदर्शनात पुढील उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

  • क्युरेटरसोबत गॅलरी वॉक
  • तज्ज्ञांचे पॅनेल चर्चासत्र
  • कारागिरांकडून लाईव्ह हँड-पेंटिंग प्रात्यक्षिक
  • विणकर आणि संशोधकांशी संवाद

पॅनेल चर्चेचे वेळापत्रक

8 ऑगस्ट 2026 | सायंकाळी 6.00 वाजता

  • डॉ. करण सिंह (माजी केंद्रीय मंत्री)
  • मुग्धा सिन्हा, IAS (व्यवस्थापकीय संचालक, ITDC)
  • बंदना प्रयाशी, IAS (संयुक्त सचिव, खत विभाग)

9 ऑगस्ट 2026 | सायंकाळी 6.00 वाजता

  • अमृत राज (विकास आयुक्त, हस्तकला)
  • डॉ. एम. बीना (विकास आयुक्त, हातमाग)
  • प्रमिल पांडे (डीन, स्कूल ऑफ डिझाईन, UID, जीडी गोयंका विद्यापीठ)

राष्ट्रीय ज्यूट बोर्डाची साथ

केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या राष्ट्रीय ज्यूट बोर्डाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनाचा उद्देश भारतीय वस्त्रपरंपरेबद्दल जनजागृती करणे आणि देशाच्या सांस्कृतिक समृद्धीत योगदान देणाऱ्या कलाकार व कारागिरांचा गौरव करणे हा आहे.

कार्यक्रमाची माहिती

  • प्रदर्शन: SAREE SHASTRA | साडी शस्त्र
  • कालावधी: 7 ते 9 ऑगस्ट 2026
  • स्थळ: आर्ट गॅलरी, कमलादेवी कॉम्प्लेक्स, इंडिया इंटरनॅशनल सेंटर (गेट क्र. 1), 40 मॅक्स म्युलर मार्ग, नवी दिल्ली – 110003
  • क्युरेटर : आदित्य के. झा

उपस्थित मान्यवर

  • रक्षाताई निखिल खडसे – केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा राज्यमंत्री
  • हेमा सोमनाथन – अध्यक्षा, IASOWA
  • के. एन. श्रीवास्तव – संचालक, इंडिया इंटरनॅशनल सेंटर
  • शिखा अजमेरा – कलाकार, फॅशन डिझायनर आणि संस्थापक, शिखाज् करिगरी

या प्रदर्शनाद्वारे भारताच्या हातमाग परंपरेचा गौरव करत “प्रत्येक साडी एक कथा सांगते आणि प्रत्येक कारागीर पुढील पिढ्यांसाठी एक अमूल्य वारसा जपतो”, हा संदेश देण्यात आला.

Follow Us
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात...
Ajit Pawar : अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात याचा अहवाल महिनाभरातच; AAIBचं आश्वासन
मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात...
Mumbai Bank Election : मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंची एन्ट्री; सहकार क्षेत्रात रंगणार चुरस
भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, अन्...
Bhandara : भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, धक्काबुक्की अन् थेट... VIDEO चर्चेत
आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
Sanjay Raut on Shivsena : आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
Farmer Loan : 5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत मोठा घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका!
Nashik : मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका! नाशिकमध्ये दोन मोठे प्रश्न ऐरणीवर
दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना, VIDEO व्हायरल
Nanded : दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना दिसले, VIDEO व्हायरल; बैठकीच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह
टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा...
Sanjay Raut on Sanjay Shirsat : टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा मला काही त्रास नाही राऊतांचा मिश्किल टोला
गणपती विसर्जनाबाबत महापौर तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या
Ritu Tawde : गणपती विसर्जनाबाबत महापौर रितू तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या?
ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल
Ambadas Danve : ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल; पुढे म्हणाले...