Chanakya Niti : पत्नीला पतीकडून फक्त ही एकच गोष्ट हवी असते, चाणक्य काय म्हणतात?
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. पती-पत्नीचं नातं कसं असावं? याबद्दल अनेक गोष्टी चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात पत्नीला फक्त पतीकडून एकाच गोष्टीची अपेक्षा असते.

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये त्यांनी मनवी नातेसंबंध कसे असावेत? याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. पती-पत्नीचं नातं कसं असावं? पत्नीला पतीकडून काय अपेक्षा असतात? पती आपल्या पत्नीकडून काय अपेक्षा करतो? संसार कसा करावा? अशा एक ना अनेक विषयांवर चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये लिहून ठेवलं आहे. चाणक्य म्हणतात पती-पत्नी ही संसाररूपी रथाची दोन चाकं असतात. जोपर्यंत ही चाकं समान गतीने चालत असतात, तोपर्यंत हा रथ सुरळीत सुरू असतो. परंतु एक जरी चाक मागे -पुढे झालं किंवा एखाद्या चाकाने साथ सोडली तर मात्र संसार कोलमडू पडतो, त्यामुळे पती-पत्नीने कायम एकमेकांचा आधार झालं पाहिजे असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. चाणक्य म्हणतात जसी पतीच्या पत्नीकडून काही अपेक्षा असतात, तशाच पत्नीच्या देखील पतीकडून काही अपेक्षा असतात. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.
चाणक्य म्हणतात एकवेळी तुम्ही गरीब असाल तरी चालेल. तुम्ही तुमच्या पत्नीला दागदागिने, महागड्या वस्तू दिल्या नाही तरी चालेल. तरी देखील ती तुमच्यासोबत आनंदी राहु शकते. फक्त ती तुमच्याकडून एकाच गोष्टीची आयुष्यभर अपेक्षा करत असते ती म्हणजे विश्वास. जर तुमचा तुमच्या पत्नीवर विश्वास असेल तर ती आयुष्यभर तुमच्यासोबत समाधानाने संसार करते असं चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये म्हटलं आहे.
तसचे चाणक्य आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये पुढे असंही म्हणतात जशी पत्नी पतीकडून विश्वासाची अपेक्षा करते तशीच ती आणखी एक गोष्टीची अपेक्षा करत असते, ती गोष्ट म्हणजे सन्मान. आपल्या पतीने आपला आदर करावा, अशी तिची अपेक्षा असते. त्यामुळे पतीने आपल्या पत्नीचा आदर हा केलाच पाहिजे, तिने केलेल्या कामांचे कौतुक केलेच पाहिजे, त्यामुळे तुमचं नातं अधिक मजबूत होतं, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
