AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ketan Agrawal Case: केतनच्या वडिलांचा धक्कादायक खुलासा! सियाचे अनैतिक संबंध… लोहगडनंतर थेट… महाबळेश्वरच्या प्लानबाबत

Ketan Agrawal Case: लोणावळा येथील लोहगड किल्यावरुन केतन अग्रवालला होणारी पत्नी सियाने ढकलून दिले. त्यानंतर केतनच्या वडिलांनी धक्कादायक खुलासा केला आहे. त्यांनी सियाचे अनैतिक संबंध असल्याचे स्पष्ट केले आहे.

Ketan Agrawal Case: केतनच्या वडिलांचा धक्कादायक खुलासा! सियाचे अनैतिक संबंध... लोहगडनंतर थेट... महाबळेश्वरच्या प्लानबाबत
Ketan Agraval CaseImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Jun 23, 2026 | 3:34 PM
Share

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील लोहगड किल्ल्यावर १८ जून रोजी व्यावसायिक केतन अग्रवालचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा ट्रेकिंग अपघात असल्याचे वाटत होते. मात्र लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या तपासात ही घटना पूर्वनियोजित खून असल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन यांनी मिळून ही हत्या केल्याचा संशय आहे. या प्रकरणात काही ठोस पुरावेही पोलिसांच्या हाती लागले आहेत. तसेच धक्कादायक माहिती समोर आली आहे.

वडिलांचा सोशल मीडियावरुन संताप

या प्रकरणात आता केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मोठे आरोप केले आहेत. त्यांनी सिया गोयलवर गंभीर आरोप करताना म्हटले आहे की, “पुण्यातील सिया प्रवीण बसेसर गोयल ही मुलगी आधीपासूनच अनैतिक संबंध ठेवून होती. तिने आमच्या साध्या-भोळ्या मुलाशी लग्नाचा बनाव केला. तिच्या चारित्र्याबद्दल आणि भूतकाळातील वर्तनाबद्दल तिच्या कुटुंबाला पूर्ण माहिती होती, तरीही त्यांनी सत्य लपवले आणि आमची फसवणूक केली.” विशाल अग्रवाल यांनी पुढे म्हटले, “आम्हा पीडित पालकांच्या मनात शाप आणि न्यायाची तीव्र इच्छा आहे.”

पाहा: सुप्रिया सुळेंच्या लेकीचा शाही विवाहसोहळा, शरद पवारांच्या लूकने वेधले लक्ष

‘जीव घेण्याची काय गरज होती?’

विशाल अग्रवाल यांनी आणखी एक धक्कादायक दावा केला आहे. ते म्हणतात, “या मुलीने यापूर्वीही केतनचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता, जो अयशस्वी ठरला. शेवटी १८ जूनला तिने आपल्या मित्राच्या मदतीने आमच्या मुलाचा क्रूरपणे खून केला.” प्रश्न उपस्थित करत ते म्हणाले की, “जर तिला लग्न करायचे नव्हते तर सहजपणे नाते तोडता आले असते. मग आमच्या निष्पाप मुलाचा जीव घेण्याची गरज काय होती? या अपूरणीय हानीची भरपाई कोण करणार?”

महाबळेश्वरचा प्लॅनही होता

केतनच्या वडिलांनी आणखी एक गंभीर आरोप केला आहे की, आरोपींनी लोहगडावर यश न मिळाल्यास महाबळेश्वरला नेऊन केतनचा खून करण्याचा प्लॅन तयार केला होता. या प्रकरणामुळे संपूर्ण घटना अधिक गंभीर आणि चिघळलेली असल्याचे दिसून येत आहे. पोलिस या सर्व आरोपांची सखोल चौकशी करत आहेत आणि आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणाने पुण्याच्या व्यावसायिक वर्तुळात मोठी खळबळ निर्माण केली आहे.

Follow Us
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!
राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
Video: दुष्काळ बाजूला ठेव, बांधावर जाऊन...राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट
Parbhani : पहाटे 4 वाजता उठायचं, 2.5 किमी... हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट, Video व्हायरल
स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज... शायना एन.सी. यांचा राऊतांवर पलटवार
Shaina NC : स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज म्हणत... शायना एन.सी. यांचा संजय राऊतांवर पलटवार