Monsoon :मान्सूनसाठीची कोकण रेल्वे प्रशासनाची तयारी पूर्ण; धोक्याच्या ठिकाणी सुरक्षेचा पहारा

प्राजक्ता ढेकळे

|

Updated on: Jun 03, 2022 | 4:22 PM

येत्या 10  जून पासून कोकण रेल्वेचा वेग मंदावणार आहे. कोकणात पावसाचे प्रमाण कमी असल्याने कोकण रेल्वेचा वेग हा तशी 75 किमी पेक्षाही कमी केला जातो. तसेच ज्या ठिकाणी सर्वाधिक पाऊस होत्या त्या ठिकाणी पाऊस मोजण्याचे सेल्फ रेकॉर्डेड पर्जन्यमान मोजाणारी यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.

रत्नागिरी – कोकण रेल्वे प्रशासन मान्सूनसाठी (Monsoon)पूर्णतः तयार असल्याचे पाहायला मिळत आहे. या निमित्ताने कोकण रेल्वे ट्रॅकची (Konkan Railway Track) पावसाळ्याच्या अनुषंगाने दुरुस्ती करण्यात आली आहे. पावसाळ्यात ट्रकवर साठणारे पाणी तसेच उद्भवणाऱ्या अन्य समस्यांवर तोडगा काढण्याचे काम रेल्वे प्रशासनाने केले आहे. पावसाळ्यात कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडू नये यासाठी 843 कर्मचारी पहारा देणारा आहेत. धोक्याच्या ठिकाणी सुरक्षा रक्षकांचा(Security guards) पहारा असणारा आहे. येत्या 10  जून पासून कोकण रेल्वेचा वेग मंदावणार आहे. कोकणात पावसाचे प्रमाण कमी असल्याने कोकण रेल्वेचा वेग हा तशी 75 किमी पेक्षाही कमी केला जातो. तसेच ज्या ठिकाणी सर्वाधिक पाऊस होत्या त्या ठिकाणी पाऊस मोजण्याचे सेल्फ रेकॉर्डेड पर्जन्यमान मोजाणारी यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI