AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ससून रुग्णालयाच्या कॅन्टीनमधून ड्रग्सची विक्री…काय आहेत आरोप

Lalit Patil | पुणे येथील ससून रुग्णालयातून उघड झालेल्या ड्रग्स प्रकरणात पोलिसांनी ललित पाटील प्रकरणात अनेक आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. या प्रकरणात आमदार रवींद्र धंगेकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. त्यात अनेक मोठे दावे केले. ललित पाटील प्रकरणात कोणाला वाचवले जात आहे, हे सांगितले.

ससून रुग्णालयाच्या कॅन्टीनमधून ड्रग्सची विक्री...काय आहेत आरोप
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Nov 09, 2023 | 11:45 AM
Share

अभिजित पोते, पुणे | 9 नोव्हेंबर 2023 : नाशिक जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या ललित पाटील याला एका ड्रग्स प्रकरणात पुणे पोलिसांनी अटक केली होती. तीन वर्षांच्या येरवडा कारागृहातील काळात तो तब्बल नऊ महिने ससून रुग्णालयात राहिला. यामुळे विरोधकांकडून सरकारला सातत्याने लक्ष केले जात आहे. या प्रकरणात सरकारने नेमलेल्या समितीचा अहवालवरुन अद्यापही कारवाई केली नाही. हाच मुद्दा उचलत आमदार रवींद्र धंगेकर यांनी गंभीर आरोप केले आहे. २७ ऑक्टोंबर रोजी ससून रुग्णालयासंदर्भातील अहवाल दिला गेला. त्यानंतर तो अजून प्रसिद्ध करत नाही. या प्रकरणात डीनला वाचवण्याचे काम राज्य सरकार करत आहे, असा आरोप आमदार धंगेकर यांनी केला.

डीन संजीव ठाकूरला पाठिशी घालत आहे

राज्य सरकार अधिष्ठाता संजीव ठाकूर याला पाठिशी घालत आहे. ललित पाटील प्रकरणात त्यांचा सहभाग स्पष्ट दिसत आहे. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. ललित पाटील यांच्याकडून पैसे घेऊन संजीव ठाकूर यांनी त्याला नऊ महिने पंचातारांकीत सुविधा दिल्याचा आरोप आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला. या प्रकरणात राज्य सरकारने नेमलेल्या समितीचा अहवाल आहे. त्यानंतर अजूनपर्यंत एकाही पोलिसांवर कारवाई नाही. अनेक लोकांनी यामध्ये पैसे घेतले आहे. सोने घेतले आहे, हे स्पष्ट झाले आहे. त्यानंतरही काहीच कारवाई नाही. ललित पाटील प्रकरण थंड करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. यामुळे हे प्रकरण हिवाळी अधिवेशनात मांडणार आहे.

उच्च न्यायालयात जाणार

सरकारकडून या प्रकरणात कारवाई झाली नाही तर आपण उच्च न्यायालयात जाऊ, असा इशारा आमदार रवींद्र धंगेकर यांनी दिला. ललित पाटील फरार झाल्या प्रकरणी तपासाला गती मिळाली नाही. मी या प्रकरणी पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे. तपास सुरू आहे तो होऊ द्या, असे त्यांनी म्हटले आहे. जे पोलीस आणि ससून रुग्णालयाचे आधिकारी दोषी त्यांना अटक करा आणि समितीचा अहवाल प्रसिद्ध करा, अशी मागणी त्यांनी केली.

ससूनच्या कॅन्टीमधून ड्रग्स विकले

ससूनच्या कॅन्टीनमधून हे ड्रग्स विकले जात होते. यात जे दोषी आहेत त्यांना अटक करा. अन्यथा आपण पोलीस आयुक्त कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करणार आहे. हा सगळा तपास केंद्रीय तपास यंत्रणेकडे द्यावा. राज्य सरकारयावर काम करणार नाही, असे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला.

Follow Us
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी