AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ललित पाटील प्रकरणातील सर्वात मोठी बातमी, ससून रुग्णालयाचे डीन संजीव ठाकूर दोषी

ललित पाटील ड्रग्ज प्रकरणातील मोठी बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने नेमलेल्या समितीने शासनापुढे अहवाल सादर केला आहे. या प्रकरणात ससून रुग्णालयाचे डीन संजीव ठाकूर आणि अस्थिव्यंगोपचार पथक प्रमुख डॉ. देवकाते दोषी आढळले आहेत.

ललित पाटील प्रकरणातील सर्वात मोठी बातमी, ससून रुग्णालयाचे डीन संजीव ठाकूर दोषी
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Nov 10, 2023 | 10:21 PM
Share

प्रदीप कापसे, Tv9 मराठी, पुणे | 10 नोव्हेंबर 2023 : ललित पाटील ड्रग्ज प्रकरणातील मोठी बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने नेमलेल्या समितीने शासनापुढे अहवाल सादर केला आहे. या प्रकरणात ससून रुग्णालयाचे डीन संजीव ठाकूर आणि अस्थिव्यंगोपचार पथक प्रमुख डॉ. देवकाते दोषी आढळले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने या दोन्ही वरिष्ठ अधिकारी आणि डॉक्टरांचं निलंबन केलं आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संजीव ठाकूर यांची आता विभागीय समिती मार्फत चौकशी होणार आहे. विशेष म्हणजे संजीव ठाकूर यांची आजच अधिष्ठता पदावरुन उचलबांगडी करण्यात आल्याची माहिती समोर आली होती.

संजीव ठाकूर यांच्यापूर्वी डॉ.विनायक काळे हे ससून रुग्णालयाचे डीन होते. काळे यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच त्यांची ससून रुग्णालयाच्या महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. सरकारच्या या निर्णयाविरोधात काळे यांनी मॅट कोर्टात धाव घेतली होती. मॅट कोर्टाने संजीव ठाकूर यांची नियुक्ती रद्द केली. त्यानंतर आता हायकोर्टानेदेखील तसाच निर्णय दिला आहे. त्यामुळे संजीव ठाकूर यांचं डीन पदाची खुर्ची कायदेशीररित्या आधीच गेलीय. त्यानंतर आता त्यांचं सरकारकडून निलंबन करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

नेमकं प्रकरण काय?

पुणे पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणात ललित पाटील याला अटक केली होती. पोलिसांना शेकडो कोटींचं ड्रग्ज मध्यंतरी देखील सापडलं होतं. ललित पाटील हा नाशिकचा रहिवासी आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या घरावरही छापा टाकला होता. या छापेमारीत पोलिसांना ड्रग्जचा मोठा साठा सापडला होता. पोलिसांनी दरम्यानच्या काळात अनेक ठिकाणी छापेमारी केली. ही छापेमारी करताना पोलीस ड्रग्जच्या कारखान्यापर्यंत जावून पोहोचले. त्यामुळे ललित पाटील हा खूप मोठा ड्रग्ज पेडलर होता हे समोर आलं आहे.

विशेष म्हणजे ललित पाटील याला पुणे पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर तो जेलमध्ये कैद होता. तो येरवडा कारागृहात गेल्या तीन वर्षांपासून कैद होता. पण तीन वर्षांच्या या कालावधीतील नऊ महिने तो ससून रुग्णालयात उपचाराच्या निमित्ताने दाखल होता. तो नऊ महिन्यांनी अचानक ससून रुग्णालयातून फरार झाला. त्याच्या फरार होण्याचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले होते. पोलिसांनी प्रचंड तपास करुन त्याला 15 दिवसांनी अटक केली. या प्रकरणावरुन राजकीय वातावरण देखील तापलं आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर या प्रकरणावर सातत्याने सरकारवर निशाणा साधत आहेत.

Follow Us
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी