आरपीआयच्या कार्यक्रमावेळी कार्यकर्ते लिफ्टमध्ये अडकले, रामदास आठवलेंनी उचललं ‘हे’ पाऊल

| Updated on: Feb 14, 2021 | 12:47 PM

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या एका कार्यक्रमात हा प्रकार घडला. (Ramdas Athawale Pimpari Chinchwad)

आरपीआयच्या कार्यक्रमावेळी कार्यकर्ते लिफ्टमध्ये अडकले, रामदास आठवलेंनी उचललं हे पाऊल
रामदास आठवले, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री
Follow us on

पुणे: केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले शनिवारी पुणे दौऱ्यावर होते. पिंपरी चिंचवडमध्ये आरपीआयच्या कार्यक्रमासाठी ते आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या ठिकाणी जाण्यासाठी रामदास आठवले लिफ्टचा वापर करणार होते. त्यापूर्वीचं काही कार्यकर्ते आणि पत्रकार लिफ्टमध्ये बसून जाऊ लागले. मात्र, ते लिफ्ट काही मध्येच बंद पडलं. लिफ्टमध्ये अडकलेल्यांनी त्यानंतर आरडाओरडा सुरु केला. ही माहिती समजल्यानंतर रामदास आठवलेंनी पायऱ्यांचा वापर करणं पसंत केले.(Lift stuck in the programme of Union State Minister Ramdas Athawale in Pimpari Chinchwad)

दुसऱ्या मजल्यावर अडकली लिफ्ट

रामदास आठवलेंनी शनिवारी पिपंरी चिंचवडमध्ये पत्रकार परिषद घेतली होती. त्यानंतर ते आरपीयआयच्या एका कार्यक्रमासाठी एका हॉटेलमध्ये गेले होते. रामदास आठवले हॉटेलमधील लिफ्टजवळील पोहोचण्यापूर्वीचं काही कार्यकर्ते आणि पत्रकार लिफ्टमध्ये बसले आणि दुसऱ्या मजल्यावर अडकले.

क्षमतेपेक्षा अधिक लोक लिफ्टमध्ये?

लिफ्टमध्येच बंद पडण्याचं कारण लिफ्टमध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोक होते, असं सांगितलं जातेय. अचानक लिफ्ट बंद पडल्यानं त्यामध्ये असणाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतंय. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना ही बाब कळताच त्यांनी लिफ्टचा दरवाजा उघडला आणि लोकांना बाहेर काढले.

रामदास आठवलेंनी यानंतर लिफ्टचा वापर करण्याऐवजी पायऱ्यांचा वापर केला. कार्यक्रम संपल्यानंतर देखील त्यांनी पायऱ्यांचा वापर केला. त्यांनी चौथ्या मजल्यावरुन खाली येण्यासाठी लिफ्ट वापरण्यास नकार दिला. काही दिवसांपूर्वी देखील अशीच घटना घडली होती.

रामदास आठवलेंचे शरद पवारांना प्रत्युत्तर

26 जानेवारीला दिल्लीतील हल्ला भाजपने घडवून आणला या शरद पवार यांच्या मतामध्ये तथ्य नाही.26 जानेवारीला आंदोलनाला परवानगी द्यायला नको होती. या प्रकणाची चौकशी व्हावी म्हणजे सत्य बाहेर येईल, असं रामदास आठवले म्हणाले.

संबंधित बातम्या:

शरद पवारांच्या त्या गंभीर आरोपांना रामदास आठवले यांचं प्रत्युत्तर, म्हणाले, चौकशी झालीच पाहिजे!

आगामी मुंबई महापालिकेत 25 उमेदवार निवडून आणण्यासाठी तयारीला लागा, रामदास आठवलेंचे आदेश

(Lift stuck in the programme of Union State Minister Ramdas Athawale in Pimpari Chinchwad)